आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"सेंट फ्रान्सिस'मध्ये प्रवेशबंदी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सेंटफ्रान्सिस स्कूलमध्ये सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्याचा गंभीर प्रकार आज (२६ जून) पहिल्याच दिवशी समोर आला. शिक्षणाच्या मुलभूत अधिकाराची पायमल्ली संस्थेकडून केली जात असून, शिक्षण विभागाच्या आदेशाला संस्था चालक ‘कचरा’ समजत असल्याचे दिसून येत आहे.

नाशिकच्या टाकळी रोड देवलगिरी हाऊसिंग सोसायटी येथील डिवाइन एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत स्थानिक जेवड नगर स्थित सेंट फ्रान्सिस स्कूलमधील सीबीएसई अभ्यासक्रमाच्या तुकड्यांना घेऊन मागील दोन वर्षांपासून वाद सुरू आहे. २३ जून रोजी दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे पत्र संस्थेला देण्यात आले, त्यात प्रवेशीत विद्यार्थ्यांचे शिक्षण येथूनच पूर्ण करण्याबाबत आदेशीत केले आहे.
शिक्षण विभागाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितल्याचे कारण पुढे करीत चक्क विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशबंदीच करण्यात आली. शिक्षण विभागाच्या आदेशाप्रमाणे सेंट फ्रान्सिस स्कूलने सीबीएसई तुकडीतून शिक्षण देण्याची पालकांची मागणी आहे. शाळा कुलूपबंद करुन शाळेतील स्टॉफ वकीलासोबत आत तर विद्यार्थी पालक बाहेर असा प्रकार बराच वेळ सुरू होता. राष्ट्रगीताच्या वेळी सीबीएसई तुकडीतील उर्वरितपान
कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई
हायकोर्टाच्या आदेशानुसार एक वर्ष सीबीएसई अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचे ठरले होते. मात्र शिक्षण विभागाने बंदचे आदेश दिल्याने अभ्यासक्रम बंद करण्यात आला. मात्र २३ जूनला शिक्षणाधिकाऱ्यांनी अभ्यासक्रम सुरू ठेवण्याबाबत पत्र दिले. या पत्राला हाय कोर्टाने स्थगिती दिल्याने अभ्यासक्रम पूर्ण पणे बंद करण्यात आला आहे. विवेकछाबडा, संचालक, सेंट फ्रान्सिक स्कूल,अमरावती.
बातम्या आणखी आहेत...