आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Separate Vidarbha Demand By Peoples Issue At Amravti

विदर्भ वेगळा व्हावा; परंतु अटलजींच्या मॉडेलप्रमाणे, ‘लढा विदर्भाचा’ कार्यक्रमात वक्त्यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - छोट्याराज्यांच्या निर्मितीसाठी देशात सध्या दोन मॉडेल्स आहेत. एक वाजपेयी सरकारच्या काळात झालेली तीन राज्यांची निर्मिती, तर दुसरे मनमोहनसिंग सरकारच्या काळात वेगळे झालेले तेलंगण. यांपैकी पहिल्या मॉडेलप्रमाणे वेगळा विदर्भ जन्माला आला पाहिजे, असे मत छत्तीसगढ येथील मान्यवरांनी व्यक्त केले.
वेगळ्या विदर्भासाठी भांडणाऱ्या जनमंच संघटनेतर्फे गुरुवारी सायंकाळी ‘लढा विदर्भाचा’ विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या वेळी ही मांडणी करण्यात आली. छत्तीसगढ राज्याच्या योजना आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. हनुमंत यादव, त्याच राज्यातील प्रसिध्‍द शिक्षणतज्ज्ञ प्रा. जवाहर सूरसेट्टी, कृषी उद्योजक संजय ब्राह्मणकर, जनमंचचे चंद्रकांत वानखडे, ‘दिव्य मराठी’चे प्रमोद चुंचूवार, ‘वेद’चे माजी अध्यक्ष विलास काळे, बहुजन राष्ट्रनिर्माण प्रशासकीय अकादमीचे संस्थापक गजानन कोरे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

म्हणून आवश्यक होते छत्तीसगढ
छत्तीसगढसह मध्य प्रदेश अखंड असताना नागरिकांना खूप त्रास व्हायचा. इन्कम टॅक्स सेलटॅक्सचे मुख्यालय इंदोरला, खाणसंबंधी परवानगी देणारे मुख्यालय रायपूरला, मंत्रालय संचालनालय भोपाळला, उच्च न्यायालय जबलपूरला, इतर महत्त्वाची मुख्यालये ग्वाल्हेरला अशाप्रकारची रचना होती. छत्तीसगढ मध्य प्रदेश वेगवेगळे झाल्याने हा त्रास संपुष्टात आला आहे.

जीडीपीहा भूलभुलय्या
जीडीपीहा एकप्रकारचा भूलभुलय्या आहे. परंतु प्रतिव्यक्ती उत्पन्न दाखवूनच एखाद्या राज्याची स्थापना व्हावी की नको, हे प्रशासकीय पातळीवर सांगितले जाते. मुळात जीडीपीवरून असे ठरवणे चुकीचे आहे. नागरिकांना मिळणाऱ्या सोयी-सवलती त्यांना दि.ल्या जाणाऱ्या सुविधा यावरून त्या-त्या राज्य, प्रांताचे स्वरूप ठरवले पाहिजे.
तो म्हणाला, दहशतवादी होणार
प्रा.जवाहर सूरसेट्टी यांनी एका परिसंवादात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले असता त्याने दहशतवादी व्हायचे, अशी महत्त्वाकांक्षा व्यक्त केली. कारण, त्याला राज्य सरकारचा संगणक प्रशिक्षण निर्णय बदलायचा होता. तो बदलवण्यासाठी त्याला शासनासोबत भांडायचे होते. मात्र, शासन खूप दूरवर असल्याने ते शक्य नव्हते. त्यामुळे दहशतवादी बनून नि:शुल्क संगणक प्रशिक्षण घ्यावे, असा त्याचा विचार होता.

नको केवळ भाषेचा आधार
राज्याचीस्थापना केवळ भाषेच्या आधारावर होऊ नये. तेलंगणसारखे ते भावनांवरही आधारित नसावे. त्यामुळे, केवळ विदर्भच नव्हे, तर देशभर छोटी-छोटी राज्ये व्हावीत. बेल्जियम, मंगोलिया, इस्टरडॅम अशी छोटी राष्ट्रे बघितल्यास छोट्या राज्यांच्या स्थापनेची गरज का सहज लक्षात येते. उद्योग आणि विद्वत्तेच्या दृष्टीने संपन्न कोणताही प्रांत छोट्या राज्यांसाठी सक्षम ठरू शकतो.

अतुल गायगोले यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. वसुसेन देशमुख यांनी संचालन केले. शेतकरी नेते तथा प्रसिद्ध कवी विजय विल्हेकर यांनी वेगळ्या विदर्भाचे गीत गायले.