आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने सात चिमुकल्यांना विषबाधा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने सात चिमुकल्यांना विषबाधा झाली. चिखलदरा तालुक्यातील मनभंग येथे गुरुवारी ही घटना घडली असून, चिमुकल्यांवर अचलपूर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दीपाली प्रेमलाल दारसिंबे (वय ५), विजय भारत बेलसरे (५), लक्ष्मी अशोक दहिकर (५), प्रेरणा राजू तांडिलकर (५), रंजना सुनील दहिकर (५), आदित्य अनिल पाडीवार (४) आणि विशाल परमंत दारसिंबे (५) या सात चिमुकल्यांना विषबाधा झाली.

चिखलदरा पंचायत समितीअंतर्गत मनभंग येथे गुरुवारी सकाळी अंगणवाडी भरवण्यात आली. यादरम्यान, मुलांना अंगणवाडीसेविकेने खिचडी खाण्यास दिली. परंतु, काही वेळाने या चिमुकल्यांना उलट्या, हागवण सुरू झाली त्यामुळे अंगणवाडीसेविका पाटणकर आणि मदतनीस सोनम बाबुलाल कास्देकर यांनी ग्रामस्थांना याची माहिती दिली. दरम्यान, काही पालकांकडून पोषण आहाराबाबत आक्षेप व्यक्त केल्याची माहिती आहे.

काळजीसाठी नेमले कर्मचारी
चिमुकल्यांनीचंद्रजोतीच्या बी खाल्याने त्यांना विषबाधा झाल्याची माहिती अंगवाडीसेविका पाटणकर यांनी दिली आहे. मुलांची प्रकृती चांगली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी अंगणवाडीचे कर्मचारी नेमले आहेत. एन.ए. काळे, प्रभारी गटविकास अधिकारी.


मुलांच्या प्रकृतीत सुधारणा
रुग्णालयातमुलांना दाखल केल्याबरोबर त्यांना भरती करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. सध्या मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉ.जाकीर, वैद्यकीय अधीक्षक, अचलपूर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय.