आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण पोलिसांनी पकडली सात दरोडेखोरांची टोळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्यातीलधामणगाव रेल्वे ते जळगाव आर्वी मार्गावर दोन दिवसांपूर्वी सात ते आठ जणांनी दुचाकीस्वारांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील रोकड लंपास केली होती. तत्पूर्वी त्याच दिवशी याच टोळीने गोदामातून चण्याचे दहा पोते चोरीचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर अवघ्या ४८ तासांत ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल सात जणांची टोळी पकडली आहे. त्यांनी या गुन्ह्यांसोबत अन्य १२ ते १५ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

शेख इसाक शेख समद (वय, २८),रमेश हीरालाल उईके (२३), सै. रिजवान सै. रफीक (१९), टिंग्या ऊर्फ धीरज दिलीप दहीसरे (१९, सर्व रा. आठवडी बाजार, धामणगाव रेल्वे), शेख राजू शेख सरदार (२१, धामणगाव रेल्वे), अजय गणेश डोमाडे (१९, सावरगाव, यवतमाळ)आणि आकाश ऊर्फ लहान्या नामदेव माहुलकर (२१, धामणगाव रेल्वे) यांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी पकडले. शुक्रवारी मध्यरात्री धामणगाव ते जळगाव आर्वी मार्गावर जळगाव येथील रहिवासी भूषण भोगे त्याचा मित्र रस्त्याने जात होते.

३० गुन्हे उघड, नऊ लाखांपेक्षा जास्त जप्ती

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आणि वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या या कामगिरीचा आदर्श इतर पोलिसांनीही घेण्यासारखा आहे. मागील सहा महिन्यांत ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने लावला आहे. हा छडा लावताना आरोपींना पकडणे तसेच गुन्ह्यात चोरी गेलेला एेवज जप्त करणेसुध्दा महत्त्वाचे असते. ऐवज जप्तीचे कामसुध्दा त्यांनी अतिशय चोखपणे पार पडले. या तीस गुन्ह्यांमध्ये जबरी घरफोडीचे १७, खुनाचे तीन, बलात्कार दरोडा, वाटमारीचे ८, अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सातत्यपुर्ण कामगिरीवर पोलिस अधीक्षक लखमी गौतमसुध्दा समाधानी आहेत.
कार घेऊन यायचा, गुन्हा करून परतायचा
पोलिसांनीयाच टोळीतील अजय डोमाडे याला पकडून त्याच्याकडून एक मारुती कार जप्त केली आहे. गुन्हे करण्यासाठी ही टोळी या कारचा एका दुचाकीचा वापर करत होते. अजय हा सावरगावरून कार घेऊन यायचा, गुन्हा करायचा दुसऱ्या दिवशी सकाळी याच कारने घरी परत जायचा. असा त्याचा नित्यक्रम होता. पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाली आहे. याच गुन्ह्यासाठी वापरलेली एक दुचाकी पोलिसांना आणखी जप्त करायची आहे.
चांगली कामगिरी, रिवार्ड देणार
स्थानिकगुन्हे शाखेने मागील काही महिन्यांपासून सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यांची कामगिरी समाधानकारक आहे. त्यामुळे ही कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याला आम्ही त्यांच्या या यशासाठी रिवार्ड देऊन त्यांना गौरवणार आहेत . लखमीगौतम, पोलिस अधीक्षक.
बातम्या आणखी आहेत...