आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला वसतिगृहातील सहा. आयुक्तांच्या कक्षात असामाजिक तत्त्व !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - समाजिक विभागातील सहायक आयुक्तांच्या कक्षात असामाजिक तत्त्वांचा वावर होत असल्याची धक्कादायक बाब गृहपालाने दिलेल्या अहवालातून पुढे आली आहे. वसतिगृहाच्या सुरक्षेबाबत वरिष्ठांना माहिती देणे तसेच अधिकाऱ्यांच्या कक्षात असामाजिक तत्त्वांचा वावर असणे, यावरून मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर आहे, हे धक्कादायक वास्तव निदर्शनास येत आहे. मुलींच्या वसतिगृहाशी संबंधित हे प्रकरण असताना वरिष्ठांकडून मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

शहरातील वसतिगृह मुलींच्या दृष्टीने असुरक्षित बनत चालल्याचे वास्तव समोर येत आहे. दाेन प्रकरणे समोर आल्यानंतर शासनाच्या अन्य एका वसतिगृहात सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह लागणे ही गंभीर बाब आहे. शिवाय वसतिगृहातील प्रकाराबाबत गृहपालाकडून वरिष्ठांना अंधारात ठेवणेदेखील तेवढेच गंभीर आहे. वरिष्ठ कार्यालयाला घटनेचा अहवाल देता माहिती सांगण्यात आली असता अधिकाऱ्यांचा कक्षात असामािजक तत्त्व बसून असल्याचे गृहपालाकडून देण्यात आलेल्या लिखित उत्तरामध्ये नमूद आहे. मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षेला छेद देण्याचा प्रकार झाला असताना घटनेचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत माहिती दिल्याने विभागाकडून गृहपालाला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. या कारणे दाखवा नोटीसला देण्यात आलेल्या उत्तरामध्ये या धक्कादायक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. सप्टेंबर १४ मध्ये सुरक्षेला छेद देण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर एका महिन्यानंतर गृहपालाकडून कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्यात आले. मात्र, अद्यापही या प्रकरणामध्ये सुरक्षा रक्षकांचा पुरवठा करणारी कंपनी वगळता संबंधित विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.
घेतला नाही धडा
‘तपोवन’सारख्याप्रख्यात अनाथालयात अल्पवयीन मुलींवर अत्याचार होतो, ही बाब मन सुन्न करणारी आहे. त्यानंतर अन्य एका वसतिगृहात कुमारी माता होण्याचे प्रकरण समोर आले. थोड्याच कालावधीत दोन प्रकरणे समोर आली असताना शहरातील वसतिगृह मुलींसाठी असुरक्षित बनत चालले असल्याचेदेखील वास्तव आहे.