आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Pawar Rally At Amravati, Divya Marathi

अमरावतीमध्‍ये ऐतिहासिक मैदानावर आज पवारांची सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा- ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या येथील परेड ग्राउंडवर उद्या (दि. 29) कृषिमंत्री शरद पवार यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. तब्बल 46 वर्षांनंतर या मैदानावर राष्ट्रीय नेत्याची सभा होण्याची ही दुसरी वेळ आहे. 1978 मध्ये दिवंगत इंदिरा गांधी यांची येथे प्रचारसभा झाली होती.

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी पवार येथे येत आहेत. पवार पाचव्यांदा परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहराला भेट देत आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे शहरात प्रथमच आगमन होत आहे. परेड ग्राउंडवर सकाळी 11 वाजता पवार यांची सभा होईल. यापूर्वी तत्कालीन आमदार बाबासाहेब भोकरे यांच्या प्रचारासाठी 1978 मध्ये इंदिरा गांधी यांची सभा या मैदानावर झाली होती. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ येथे इंदिरा पार्कची निर्मिती करण्यात आली होती. आज हा पार्क अस्तित्वात नसला, तरी ऐतिहासिक सभांमुळे परेड ग्राउंडला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

परेड ग्राउंडला ब्रिटिश काळापासून महत्त्व प्राप्त झाले आहे. 1823 पासून या मैदानावर ब्रिटिशांचे सैन्यदल कवायती करीत असे. तेव्हापासून हे मैदान परेड ग्राउंड म्हणून ओळखले जाऊ लागले. 1893 मध्ये अचलपूर कॅम्प नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर 1931 पासून 11 एकर 40 गुंठे असलेले हे मैदान नगरपालिकेने ताब्यात घेतले.

हेलिपॅडसाठीच होत असे परेड ग्राउंडचा वापर
इंदिरा गांधी यांच्या जाहीर सभेनंतर या मैदानाचा वापर हेलिपॅडसाठीच करण्यात येत आहे. तत्कालीन मंत्री एन. के. पी. साळवे, तर फिनले मिल्सच्या उद्घाटनप्रसंगी तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री शंकरसिंह वाघेला यांचे हेलिकॉप्टर याच मैदानावर उतरले होते.