आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market Up But Agriculture Product Down News In Marathi

शेअरची उसंडी-शेतमालाची घसरंडी, ओलाव्याच्या नावाखाली मिळतात अल्पभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शेअरबाजाराचा निर्देशांक दिवसेंदिवस नवनवीन विक्रम प्रस्थापित करीत असताना बाजारात तूर वगळता इतर शेतमालाचे भावात कमालीची घसरण होत आहे. दरम्यान, येथील बाजार समितीत गुरूवारी (दि. २२) चांगल्या दर्जाच्या कडक तुरीला विक्रमी कमाल ५६०० रुपये दर मिळाला. नवीन हरभरा, सोयाबीनच्या दरात मात्र कमालीची घसरण झाली आहे.

शेअरबाजारात निर्देशांकाची सातत्याने घोडदौड कायम आहे. दररोज निर्देशांक नवनवीन विक्रम स्थापित करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु शेतमालाच्या बाजारात दिवसेंदिवस भाव घसरत असल्यामुळे दुष्काळी स्थितीत शेतकर्यांची अवस्था बिकट होत आहे.

बाजारात सध्या नवीन तूर हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. हरभरा, तुर आदी पिकांची भीषण अवस्था पाहता तुरीच्या भावात सध्या तेजी आली आहे. बाजारात आज कडक चांगल्या दर्जाच्या तुरीला सर्वाधिक ५६०० रुपये दर मिळाला. सरासरी सर्वसाधारण तुरीला ४९०० ते ५००० दर मिळून तुरीचा सर्वात कमी दर ४५०० रुपये मिळाला. बाजारात आज २०६७ तुरीच्या पोत्यांची आवक झाली होती.

बाजारात सध्या तुरीचे भाव तडकले असले तरी सर्वाधिक भाव मिळण्यासाठी तुर अत्यंत कडक स्वच्छ असणे आवश्यक आहे. दरम्यान, किरकोळ कचरा जरी तुरीत दिसून आला तरी शेतकऱ्यांना शंभर ते ६०० रुपये कमी दर मिळत आहेत.

त्यातच किरकोळ आद्रता असल्याचे कारण पुढे करूनही भरमसाठी दर कमी करून तुरीची खरेदी करण्यात येत आहे. दरम्यान, मागील वर्षी ओलाव्याचे कारण पुढे करून भर हंगामात सरासरी तुरीला ३५०० ते ३७०० रुपये प्रति क्विंटल दर तुरीला मिळाले होते. नंतर तुरीचे दर प्रचंड वाढल्यामुळे याचा फायदा व्यापाऱ्यांना झाला होता. शेतातच तुर स्वच्छ काढण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणतीच तांत्रिक यंत्रणा नसल्यामुळे नाईलाजाने भाव चांगले असूनही शेतकऱ्यांना मात्र ते मिळू शकत नाही.

सोयाबीनहीघसरले : चालूआठवड्याच्या सुरवातील ३३०० रुपयांवर असलेल्या सोयाबीनचे दर सरासरी शंभर रुपयांनी घसरले आहे. बाजारात सोयाबीनची आवक अत्यल्प आहे. मिळणारा भाव फुटकळ असल्यामुळे चांगल्या भावाच्या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. परंतु विकण्यासाठी काहीच नसल्यामुळे दऔनंदिन गरजा भागवण्यासाठी मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे.

तीन महिने भाव वाढीच्या आशेने साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशेवर बाजारातील अल्प भावाने पाणी फेरले आहे. बाजारात आज सोयाबीनची ५६५५ पोत्यांची आवक झाली. सोयाबीनला किमान २७५० तर कमाल ३२७० रुपये दर मिळाला.