आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कटिंग, दाढी होईल आता शंभर रुपयांत, नाभिक दुकानदारांनी घेतला दरवाढीचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वाढत्या महागाईमुळे सलून व्यावसायिकांनी कटिंग-दाढी, मसाज, फेशियलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता कटिंग ,दाढीसाठी शंभर रुपये मोजावे लागतील. ही दरवाढ एक फेब्रुवारीपासून शहरात लागू होणार आहे. श्रीकृष्ण पेठ येथील समाज मंदिरात शनिवारी (दि. २४) पार पडलेल्या अमरावती महानगर नाभिक दुकानदार संघटनेच्या बैठक हा निर्णय घेण्यात आला. वाढत्या महागाईला अनुसरून कटिंग-दाढीच्या दरांवर सर्व संमतीने बैठकीत चर्चा करण्यात आली.

नॉन एसी सलूनमध्ये आतापर्यंत ७० रुपये कटिंग, दाढीचे दर होते. मात्र, त्यामध्ये एक फेब्रुवारीपासून वाढ करण्याचा निर्णय व्यावसायिकांनी घेतला आहे. नवीन दरानुसार, कटिंगसाठी ६० रुपये, तर दाढीसाठी ४० असे एकूण शंभर रुपये नॉन एसी सलूनमध्ये मोजावे लागणार आहेत. साधारण दुकानात मात्र हेच दर अनुक्रमे ४०, ३० म्हणजे कटिंग-दाढीसाठी ७० रुपये असे राहणार आहेत. तर, एसी सलूनमधील दरात वीस रुपयांची वाढ झाली. नवीन दरानुसार कटिंग-दाढीसाठी १२० रुपये एसी सलूनमध्ये मोजावे लागणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय राव यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत या विषयी चर्चा करण्यात आली. शिवाय ब्लीच, फेशियल मसाजच्या दरांमध्येही साधारण वाढ करण्यावर एकमत झाले. याची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सतीश देवघरे यांनी दिली आहे.

एक फेब्रुवारीपासून शहरातील सलूनमध्ये नवीन दर लागू होतील, असेही त्यांनी सांिगतले. सर्व दुकानदारांना नवीन रेटबोर्ड देण्यात येणार आहे, असे दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय राव यांनी सांिगतले. मंगेश खरपकर, विकेश ढेंगेकर, सतीश देवघरे, विजय कुंभेकर, विवेक राऊत, किरण शेलेकर आदींची बैठकीला उपस्थिती होती.

3000 कारागीर करतात काम
1200 सलून आहेत शहरात

असे आहेत नवीन दर
एसीनॉन एसी साधारण
70कटिंग 60 कटिंग 40कटिंग
50 दाढी 40 दाढी 30 दाढी