आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेत संघटनात्मक बदल होण्याचे संकेत, रामदास कदम रवींद्र मिर्लेकर यांचे आज आगमन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शिवसेनेत संघटनात्मक बदलाचे संकेत असून या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम रवींद्र मिर्लेकर शुक्रवारी (दि.३०) शहरात येत आहेत. दोन्ही शिवसेना नेत्यांकडून तब्बल सात तास विधानसभानिहाय संघटनात्मक आढावा घेतला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत विदर्भातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने मुसंडी मारल्याने ‘मातोश्री’वरुन याची गंभीर दखल घेतली असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विशेष प्रेमामुळे अमरावती हे विदर्भातील शिवसेनेचा बालेकिल्ला बनला होता. शिवसेनेतील प्रत्येक घडामोडीची पहिली प्रतिक्रीया अमरावतीत उमटत होती. मात्र गटबाजीमुळे मागील काही वर्षांपासून शिवसेना उतरंडीला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. गटबाजी तसेच दुखावल्याने अनेक निष्ठावान शिवसैनिकांनी घरी बसणेच पसंत केले आहे. लोकसभेत यश मिळाले असले तरी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांवरून शिवसेनेची जिल्ह्यातील स्थिती आणि कामगिरी स्पष्ट होते. बडनेरा तिवसा हे दोन मतदार संघ वगळता अन्य ठिकाणी समाधानकारक मते देखील मिळू नये, ही बाब वरिष्ठ स्तरावरून गंभीरतेने घेण्यात आली. काही दिवसांपूर्वीच महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदािधकाऱ्यांसोबत संघटनात्मक बाबींवर चर्चा केली. मकर संक्रातीच्या दिवशी पदाधिकाऱ्यांनी महसूल राज्यमंत्री राठोड यांना जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारण्याची विनंती केली होती. विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. खासदार आनंदराव अडसूळ यांच्याकडे संपर्क प्रमुख म्हणून देखील जबाबदारी आहे, मात्र त्यांना शह देत शिक्षक मतदार संघातून निवडूण आलेले आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांच्याकडे पश्चिम विदर्भ सहसंपर्क प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार देशपांडे हे दिवाकर रावते गटाचे असल्याची ख्याती शिवसेनेत आहे. रावते यांच्याकडे संपर्क प्रमुख जबाबदारी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेची पानेमुळे खोलवर रुजताना दिसत आहे. हेच चित्र रावते यांच्याकडे जबाबदारी असताना अमरावतीत होते. मात्र बदलत्या राजकीय स्थितीत शिवसेनेची जिल्ह्यातील स्थिती देखील बदलत गेली. खासदार आनंदराव अडसूळ, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या पूर्वी संपर्क प्रमुखाची जबाबदारी सांभाळली असलेले रवींद्र मिर्लेकर देखील उद्या विश्रामगृह येथे पदािधकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. संजय राठोड यांच्यानंतर दोन वरिष्ठ नेत्यांकडून आढावा घेतला जाणार असल्याने संघटनात्मक फेरबदल होण्याच्या संभावनेला अधिक बळ मिळाले आहे.
असा घेणार आढावा