आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shivsena Chief Uddhav Thackeray Address To Party Worker In Amravati

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणुकीची करा तयारी, गटबाजी केल्यास हकालपट्टी- उद्धव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- गटबाजी केली, तर हाकलून लावू, असा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांना दिला. गटप्रमुख व्हा; मात्र गटातटाचे बनू नका. प्रमुख राजकीय पक्ष म्हणून शिवसेना समोर येत असल्याचे अनेक सर्वेक्षणांतून पुढे आले आहे. त्यामुळे विजयाच्या दृष्टीने गटप्रमुखांनी कामाला लागले पाहिजे, असेही ते म्हणाले.

‘विमवि’च्या संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात जिल्ह्यातील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा शनिवार (10 ऑगस्ट) पार पडला. यावेळी ते बोलत होते. ‘सैनिक हे मरण्यासाठीच असतात,’ असे विचार असलेल्या शेळपट कॉंग्रेसवाल्यांच्या भरवशावर देश सोडू नका. नागरिकांचा शिवसेना कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सेनेच्या गटप्रमुखांनी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर युवा सेनेचे आदित्य ठाकरे, पक्षनेता अनिल देसाई, खा. अनिल देसाई, खा. आनंदराव अडसूळ, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी खासदार अनंत गुढे, आ. अभिजित अडसूळ, जिल्हाप्रमुख संजय बंड, बाळासाहेब भागवत, महापालिका विरोधी पक्षनेता प्रा. प्रशांत वानखडे, महानगर प्रमुख दिगांबर डहाके, अमोल निस्ताने उपस्थित होते.


मतदार यादी चोख बनवा
दुबार, बोगस आणि मृत व्यक्तींच्या नावांनी मतदान करून कॉंग्रेसवाले निवडून येतात. त्यामुळे खबरदारी घ्या, बोगस मतदार शोधून काढण्यासाठी मेहनत घ्या.
सुभाष देसाई, पक्षनेता

युवा धोरण निश्चित करू
शिवसेनेत गटप्रमुखांच्या रूपाने नवीन सरकार तयार होत आहे. तरुण वर्ग सेनेकेडे आकर्षित होत आहे. शिवसेनेचे सरकार आल्यास युवा पिढीसाठी धोरण निश्चित करू.
आनंदराव अडसूळ, खासदार

प्रत्येक खांद्यावर भगवा दुपट्टा
शिवसेनेच्या आज झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उपस्थित असलेल्या प्रत्येक गटप्रमुखाच्या खांद्यावर भगवा दुपट्टा दिसून आला. गटप्रमुखांची संख्या लक्षात घेता, संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृह कमी पडले.

आजी-माजींनी घातला हार
खा. आनंद अडसूळ आणि माजी खा. अनंत गुढे यांनी संयुक्तपणे उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. मागील काही दिवसांपासून गुढे आणि अडसूळ यांच्यात जमत नसल्याची चर्चा होती. मात्र, मेळाव्यातील दोघांच्याही वागण्यातून तसे जाणवले नाही.