आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीसूर्या ग्रुपची शहरातील मालमत्ता केली जप्त, लवकरच मिळेल गुंतवणूकदारांना दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- श्रीसूर्या ग्रुपची शहर आणि शहराच्या आजूबाजूने असलेल्या मालमत्तेचा शोध आर्थिक गुन्हे शाखेने घेऊन एका संकुलातील व्यापारी गाळा जप्त केला आहे. लवकरच श्रीसूर्या प्रकरणात गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक अशी माहिती पुढे येणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.

श्रीसूर्याचे संचालक समीर व पल्लवी जोशी यांना पोलिसांनी अटक केली. तपासादरम्यान श्रीसूर्याच्या मालमत्तेची माहिती घेतली गेली. नागपूर पोलिसांनी यापूर्वीच श्रीसूर्याची 20 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली आहे. श्रीसूर्या ग्रुपच्या काही गुंतवणूकदारांनी परस्परच श्रीसूर्याच्या संचालकांकडून मालमत्ता घेतल्याचीसुद्धा माहिती मिळाली आहे. त्यामुळेच आता अशा गुंतवणूकदारांचा शोध घेण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. असे गुंतवणूकदार नागपुरात वा अन्य ठिकाणी आहेत. तपासात प्रगती असून आगामी दोन दिवसांत शहरातील गुंतवणूकदारांना दिलासा मिळेल, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांनी दिली.