आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती- अपंगांप्रमाणेच सिकलसेलग्रस्तांनाही एसटीतून मोफत प्रवासाचा दिलासादायक निर्णय सरकारने घेतला आहे. उपचारासाठी त्यांना वारंवार प्रवास करावा लागत असल्याचे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील 436 रुग्णांना याचा लाभ मिळणार आहे.
बहुतांश व्यक्तींना हा आजार जन्मत: झालेला असतो. त्यांना वांरवार उपचारासाठी जिल्हा किंवा तालुकास्तरावरील रुग्णालयात जाऊन रक्तचाचणी आणि इतर चाचण्या कराव्या लागतात. आजाराने गंभीर स्वरूप धारण केल्यास रुग्णाला दर पंधरा दिवसांनीच नियमितपणे उपचार घ्यावे लागतात. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सिकलसेलग्रस्तांना 100 टक्के आणि त्याच्यासोबत अन्य एकाला तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
रुग्णांसाठी प्राथमिक उपचाराची सुविधा प्रत्येकच एएनएमकडे उपलब्ध आहे. मात्र, काही प्रमुख चाचण्यांची व्यवस्था धारणी, अमरावती, दर्यापूर, चिखलदरा, मोर्शी आणि अचलपूर येथील रुग्णालयांमध्येच असून, त्यांना नेहमी या ठिकाणी यावे लागते.
एचआयव्हीग्रस्तांनाही मोफत प्रवासासाठी प्रयत्नरत
सिकलसेलग्रस्तांप्रमानेच राज्य शासनाने एचआयव्हीग्रस्तांना एसटीमध्ये मोफत प्रवास करण्यासाठी योजना राबवावी, यासाठी लवकरच विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांना पत्र देणार आहे. कारण तेच राज्य एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. यासंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती फेथ फाउंडेशनच्या अध्यक्ष पूजा उमेकर यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.