आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटात दिसले दुर्मिळ ‘चांदी अस्वल’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मेळघाटच्या जंगलात दुर्मिळ प्रजातीचे चांदी अस्वल आढळून आले आहे. पोर्णिमेच्या रात्री मे रोजी झालेल्या वन्यजीव गणनेत हे चांदी अस्वल वन्यजिव प्रगणकांच्या दृष्टीस पडले.

वन्यजीव गणनेत हे अस्वल दिसल्याची नोंद करण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजिव विभागाअंतर्गत येणार्‍या जंगलात या प्रजातीचे चांदी अस्वल दिसले असल्याचे उपवनसंरक्षक उन्मेष वर्मा यांनी कळविले आहे. आकाराने लहान असलेला हा प्राणी दुर्मिळ आहे. मध्य भारतातील जंगलांमध्ये आणि दक्षिणेतील काही वनविभागात हा प्राणी आढळतो. मात्र चांदी अस्वल हे निशाचर असल्याने फक्त रात्रीच हा प्राणी दिसतो, असे वन्यजिव अभ्यासक जयंत वडतकर यांनी सांगितले. वर्षातुन एक वेळा पोर्णिमेच्या रात्री लख्ख चंन्द्र प्रकाशात वन्यप्राणी गणना करण्यात येते. ऐन उन्हाळ्यात गर्मी वाढत असल्याने रात्रीच्या वेळी वन्यप्राणी जंगलातील पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात. यावेळी चंन्द्राच्या प्रकाशात सर्वच प्राणी ठळकपणे दिसतात. त्यामुळे जंगलात कोणकोणत्या प्रजातीच्या प्राण्याचे वास्तव्य आहे याचा लेखाजोखा दरवर्षी घेतल्या जातो.

चांदी अस्वलाचे वास्तव्य
दुर्मिळअसलेल्या चांदी अस्वलाचे मेळघाटच्या जंगलात वास्तव्य आहे. मात्र सहजासहजी हा प्राणी दिसत नसल्याने प्रत्यक्ष जवळून बघण्याची संधी फारच काही जणांना मिळते.