आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवकालीन इतिहासाच्या दर्शनाने भारावले रसिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-शिवाजी राजांचे मावळ्यांवरील प्रेम, राजमाता जिजाऊंनी शिवरायांना दिलेली शिकवण, अफजलखानाचा वध असे शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग ‘मी मराठी’ नाटकातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले. जसजसे नाटक पुढे सरकत होते, तसतसे टाळ्यांचा कडकडाट सभागृहात गुंजत होता. निमित्त होते अमरावती जिल्हा परिषदेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय अधिकारी-कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे.

शिवकालीन इतिहासाच्या जिवंत सादरीकरणाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारे कलावंतांचे सादरीकरण बघताना प्रेक्षक हात उंचावून कलावंतांचा उत्साह वाढवत होते. हे सादरीकरण आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी सभागृह खच्चून भरले होते. रात्रीच्या आल्हाददायक वातावरणात संगीतमय नृत्य, नाट्य व लोकप्रिय गीत-सुरांच्या मैफलीच्या साक्षीने सभागृहात चैतन्याचे वातावरण होते.

र्शी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरप्रेक्षागृहामध्ये शुक्रवारी सायंकाळी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी दज्रेदार कलाविष्काराचे सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. महोत्सवात अंजनगावसुर्जी, अचलपूर, भातकुली, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, चिखलदरा, अमरावती पंचायत समिती तसेच अमरावती मुख्यालयाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी संगीतमय नृत्य, नाटक व गीत सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.

संगीतमय नृत्य, नाटक व लोकप्रिय गीतांच्या मैफलीने शुक्रवारचा दिवस गाजवत उपस्थितांना भुरळ घातली. दरम्यान, काहींनी अभिनेत्यांची नक्कल करून उपस्थितांना खदखदून हसवले, तर काही कलावंतांनी देशभक्तीपर गीते सादर करून डोळ्यांमध्ये पाणी आणले. नाटकातील दृश्याने अनेक जण अवाक् झाले, तर लोकप्रिय हिंदी गीतांनी हृदयाचा ठाव घेतला.

तत्पूर्वी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता मंडळाच्या प्रांगणावर उद्घाटन समारंभ झाला. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, बांधकाम सभापती जयप्रकाश पटेल, मनोहरराव सुने, महेंद्रसिंह गैलवार, चंद्रपाल तुरकाने, अर्चना मुरुमकर, र्शीहव्याप्र मंडळच्या सचिव माधुरी चेंडके तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी, संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.