आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा अभ्यासिकेतील आणखी सहा जणांना नोकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती ; पोटाला चिमटा घेत श्‍िाक्षण पूर्ण करणाऱ्या शहरातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या मनपाच्या अभ्यासिकेतील आणखी सहा उमेदवारांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. पाच जणांची रेल्वेत तर एका युवतीची सीआरपीएफमध्ये निवड झाली आहे. यामध्ये मंगेश कुऱ्हाडे, सचिन पळसपगार, मिलींद ओलवे,विकास सरदार, अश्विनी खोब्रागडे देवका राऊत यांचा समावेश आहे. यापैकी देवका ही सीआरपीएफमध्ये भरती झाली असून उर्वरित पाच जणांना भारतीय रेल्वेत सहायक स्टेशन मास्तर या पदावर नोकरी मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे सर्व िवद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून िनयमितपणे अभ्यासिकेत येत होते.

कमकुवत घटकातील उमेदवारांनाही स्पर्धा परीक्षा नोकरीची संधी मिळवता यावी म्हणून मनपाने अभ्यासिका सुरु केली. कॅम्प परिसरात मनपा आयुक्तांच्या िनवासस्थानाशेजारी ही इमारत आहे. येथे गरजूंना शैक्षणिक मदत केली जाते. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आवश्यक पुस्तके, मार्गदर्शन असे याठिकाणचे आयोजन असते. कृष्णानगर झोनचे सहायक आयुक्त तथा महिला बालविकास अधिकारी नरेंद्र वानखडे यांंच्याकडे या केंद्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आयुक्तांचे विशेष लक्ष
अभ्यासिकेकडेमनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचे विशेष लक्ष आहे. मनपासारख्या सुविधा पुरविणाऱ्या यंत्रणेने समाजाला आवश्यक त्या बाबी पुरवाव्या, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे अभ्यासिकेसाठी आवश्यक सामग्रीबाबत ते आग्रही असतात

^मनपाच्या अभ्यासिकेची क्षमता १०० विद्यार्थ्यांची आहे. भविष्यात आणखी काही ठिकाणी उपकेंद्रे उघडून हा उपक्रम वाढविण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. अकोलीत लवकरच नवे केंद्र उघडण्याची तयारी सुरू आहे. आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार आणखी प्रेरणादायी कामे व्हावीत, असा महिला बालविकास विभागाचा प्रयत्न आहे. नरेंद्रवानखडे, अभ्यासिका प्रमुख, मनपा. अमरावती.
बातम्या आणखी आहेत...