आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप, तोडफोड अन् दहशत, दहशत पसरवण्याचा प्रयत्न, दुचाकींची केली तोडफोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- फेसबुक’वरसमुदायाच्या भावना दुखावणारे आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्याच्या वार्तेमुळे संतप्त युवकांनी बुधवारी सायंकाळी यशोदानगर, दस्तुरनगर भागातील दुकानांवर बेधुंद दगडफेक केली. धमकावून दुकानं बंद पाडली. हातगाडीवाल्यांच्या साहित्याची फेकाफेक करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. दगडफेकीत चौघे जखमी झालेत. परिसरात तणाव दहशतीचे सावट पसरल्यामळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सायंकाळी परिसरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.
परिसरात दहशत पसरवत दस्तुरनगर चौकातून हातात काठ्या, दगडं घेऊन निघालेल्या चार-पाच तरुणांचे टोळके यशोदानगरात पोहोचले. त्यांनी एका एटीएमवरही दगडफेक केली. दस्तुरनगर चौकातील पानटपरी, हातगाडीवर दगडफेक केली. यामुळे परिसरात पळापळ सुरू झाली. हातात काठ्या दगडांमुळे सर्वसामान्यांची त्यांना हटवण्याची हिंमत होत नव्हती. मात्र, दस्तुरनगरजवळ काही युवकांनी या हल्लेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनाही दगडांचा मारा सहन करावा लागला.
पोलिसबंदोबस्त तैनात
दगडफेकीच्याघटनेनंतर पोलिस आयुक्त डॉ. मेकला, उपायुक्त बी. के. गावराने, एसीपी साखरकर, फ्रेजरपुराचे ठाणेदार देशमुख, गुन्हे शाखेचे प्रमेश आत्राम यांच्यासह पोलिसांची मोठ्या संख्येत फौज यशोदानगर, दस्तुनगर परिसरात तैनात करण्यात आली आहे. याचवेळी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. परिसरात तणावसदृश स्थिती होती. मात्र, काही वेळानंतर वातावरण शांत झाले होते.
शांततासमितीच्या बैठकीत करण्यात आले शांततेचे आवाहन
घटनेच्यापार्श्वभूमीवर फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात यशोदानगर, दस्तुरनगर परिसरातील काही नागरिकांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपायुक्त बी. के. गावराने, एसीपी साखरकर, ठाणेदार रियाजोिद्दन देशमुख उपस्थित होते. परिसरात शहरात शांतता राखण्याचे आवाहन या वेळी नागरिकांना करण्यात आले आहे.