आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल साइट्सवर ‘एलबीटी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - जकात कराला विरोध करणार्‍या व्यापार्‍यांना सध्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) छळत असून, त्याविरोधात विरोधाचे सूर उमटत आहेत. त्यातच मुंबईत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा झाली अन् एलबीटी विरोध अमरावतीमधील सोशल साइट्सवर पुन्हा एकदा आगळ्यावेगळ्या पद्धतीने उमटला.

मुंबई येथे रविवारी मोदींची सभा झाली. त्यात त्यांनी एलबीटीचा उल्लेख ‘लूट बाटने की टेक्निक’ असा केला. बस्स हेच पुरेसे होते. अमरावतीमधील व्यावसायिकांनीही मोदींचे नेमके हेच वाक्य उचलले आणि सुरू झालं सोशल सायटिंगवर नाराजी प्रदर्शन. सायंकाळपर्यंत फेसबूक, ट्विटर, वॉट्स अँप, बीबीएस, टँगो, हँगआऊट, एफबी मॅसेंजर, याहू मॅसेंजर यांवरून एलबीटीबद्दलही उपरोधिक मॅसेजबाजी सुरू झाली. अनेक टेक्नोयुजर व्यापार्‍यांनी मोबाइल, वेबवरून केवळ एलबीटी बोले तो ‘लूट बाटने की टेक्निक’ इतकेच वाक्य टाइप करून शेअर केले. आता खुद्द मोदी आणि राज्यातील विरोधी पक्षानेच राज्य सरकारवर हा थेट आरोप केल्याने टीकाकार अन् विरोधकांनाही संधी मिळाली. झालं मग काय, दुपारपासून सुरू झालेली ही एलबीटीची उपरोधिक मॅसेजबाजी दिवसभर वेगवेगळ्या पेजेस, अकाउंट वॉल आणि चॅट ग्रुप्समध्ये सुरू होती .