आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदान कचरा तर सोडा, घनकचरा व्यवस्थापनात होतोय ‘अर्थ’पूर्ण गोलमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात गोलमाल असून, ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्यासाठी चक्क अर्धवट रिकाम्या ट्रकचेही भाडे दिले जाते, असे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. पालिकेकडे सध्या तरी हा दोष दूर करण्याची यंत्रणा नाही. मात्र, नजिकच्या भविष्यात कचरा डेपोवर धर्मकाटा इतर यंत्रणा उभारली जाईल, असे दूरस्थ धोरण आखण्यात आल्याची माहिती आहे.
अमरावतीच्या ४३ प्रभागांमध्ये विभागलेल्या ८७ वॉर्डार्डांमध्ये मनपातर्फे घनकचरा व्यवस्थापन केले जाते. या व्यवस्थापनातूनच आठ लाख लोकसंख्या असलेल्या शहराचे स्वास्थ्य जपावयाचे आहे. मात्र, स्वास्थ्य जपण्याची जबाबदारी असलेली ही यंत्रणाच किडल्याचे एका पाहणीत दिसून आले.
वॉर्डार्डा-वॉर्डार्डांतील घरे रस्त्याच्या कडेला असलेला कचरा एका ठिकाणी गोळा करणे. वाहत्या तुंबलेल्या नाल्यांमधील कचरा बाहेर काढणे आणि अशाप्रकारे जमा झालेला घनकचरा घंटी कटल्याच्या माध्यमातून आधी कंटेनरपर्यंत त्यानंतर ट्रकच्या सहाय्याने तो कंपोस्ट डेपोपर्यंत नेणे, अशी कचऱ्याच्या विल्हेवाटाची सध्याची पद्धत आहे. त्यासाठी सफाई कामगार ते आरोग्य अधिकाऱ्यापर्यंतची लांबलचक यंत्रणाही आहे. परंतु आपापसातील ‘अर्थ’पूर्ण संबंधांमुळे या यंत्रणेतील बहुतेक घटकांना कीड लागली आहे. त्यामुळे कचरा नीट साफ केला जात नाही. यामुळे सामान्य नागरिक प्रचंड वैतागला असून, ट्रकमधून रस्त्यावर सांडणारा कचरा आणि कचरा वाहून नेताना काळजी घेतल्यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीने नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
साडेआठ लाखांपेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या अमरावती शहराचे आरोग्य राखण्यासाठी सफाई कामगार, बीट प्यून, स्वच्छता निरीक्षक, सहायक स्वच्छता अधिकारी, आरोग्य अधिकारी अशी हजारावर कर्मचारी-अधिकाऱ्यांची फळी आहे.

३५० घंटीकटले, तेवढेच कंटेनर, ४३ हायड्रोलिक ऑटो, दोन कॉम्पॅक्टर, रस्ता दुभाजक साफ करण्यासाठी अत्याधुनिक मशीन, दोन बॉबकॅट आदी साधनेही संबंधितांना दिली आहेत.
हे कमी की काय, म्हणून प्रभागनिहाय ठेकेदारांची नियुक्ती आणि त्यांच्या िदमतीला पुन्हा मनपाचे मजूर अशी नवी यंत्रणासुद्धा उभी करण्यात आली आहे. या सर्वांवर दररोज एक लाखांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली जाते; तरीही स्वच्छतेचा तीन-तेरा कायमच आहे. याचा वेध घेण्याचाच हा प्रयत्न...
असे मापदंड; असे आहे वास्तव
रस्त्यांवरीलवर्दळ म्हणजेच नागरी जीवन सुरू होण्यापूर्वी शहरातील रस्ते, नाल्या चौक साफ झाले पाहिजेत. मनपाने कागदोपत्री या बाबी मान्यही केल्या. परंतु वास्तव मात्र तसे नाही. सध्या यातील बहुतेक बाबी कंत्राटी पद्धतीने हाताळल्या जातात. त्यामुळे मजुरांकरवी होणारी रस्त्यांची सफाई सकाळी नऊ-दहा वाजेपर्यंत सुरू असते.
हा घ्या पुरावा...
संबंधित प्रतनिधीने जेव्हा याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली, तेव्हा कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकांमधून कचरा सांडणे, महापालिकेच्या कॉम्पॅक्टरमधून थेट चौकात घाणपाणी सांडणे, कंपोस्ट डेपोकडे जाणारे बहुतेक ट्रक अर्धवट भरलेले असणे आदी बाबी िबनबोभाट सुरू असल्याचे लक्षात आले. मुळात यावर महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. परंतु ‘अर्थ’पूर्ण संबंधांमुळे अशा तगड्या यंत्रणेचा अभाव आहे.