आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावयानेच चिरला ६० वर्षीय सासऱ्याचा गळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
-------------------
अमरावती - नांदगावखंडेश्वर तालुक्यातील कंधरा गावातील ६० वर्षीय वृद्धाची रविवारी रात्री जावयानेच गळा चिरून हत्या केली. तसेच, संशय येऊ नये म्हणून मृतदेह मुख्य मार्गावर आणून टाकला. सोमवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी जावयाला अटक केली.

रामदास लहानुजी क्षीरसागर (६०, रा. कंधरा, ता. नांदगाव खंडेश्वर) खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, रमेश पांडुरंग कुरचळे (४०, रा. कंधरा) असे मारेकरी जावयाचे नाव आहे. शेतीच्या वादातून रविवारी रात्री सासरे जावयामध्ये क्षीरसागर यांच्या घरामध्ये बाचाबाची झाली. यानंतर रमेशने रामदास यांच्या गळ्यावर विळ्याने वार करून गळा चिरला. त्यामध्ये क्षीरसागर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर रमेशने क्षीरसागर यांचा मृतदेह कंधरा ते नांदगाव खंडेश्वर रस्त्यालगत आणून टाकला.
सोमवारी मृतदेह असल्याची माहिती नांदगाव खंडेश्वर पोलिसांना मिळाली. ठाणेदार एस. आर. चव्हाण पथकासह घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी जावयाचा शोध घेतला त्याला पकडले. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी रमेश कुरचळेविरुद्ध खून, खुनाचा पुरावा नष्ट करणे या कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.