आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाप’ माणसातली ‘माय’ हरवतेय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- खांद्यावर घेऊन बाजार फिरवणारा बाप... बोट धरून शाळेत सोडणारा बाप... आई रागावलीच तर पोटाशी घेऊन कुरवाळणारा बाप...बाहेरून येताना चुकता खाऊ घेऊन येणारा बाप आज हरवताना दिसत आहे. या बाबींचा मुलांच्या विकासावर मानसशास्त्रीय परिणाम होताेय, असे अभ्यासकांचे म्हणणे अाहे...
जगण्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी अधिकवेळ घराबाहेर राबणाऱ्या बापामुळे कुटुंबात दुरावा निर्माण होतो. यामुळेच भविष्यातील भावनिक ओलावा नष्ट होऊ शकतो, अशीही मते अभ्यासकांनी मांडली आहेत. आज फादर्स डेनिमित्त या महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाश टाकण्याचा दै. दिव्य मराठी ने केलेला हा प्रयत्न...
मुले आणि पित्यामध्ये दिवसेंदिवस निर्माण होणाऱ्या दुराव्याचे दूरगामी परिणाम काय असू शकतील या विषयावर दिव्य मराठीने मानसशास्त्राच्या अभ्यासकांची निरीक्षणे, मते जाणून घेतली आहेत. आज शहरात उदरनिर्वाह करणाऱ्या पालकांना घराबाहेर अधिकवेळ राबल्याशिवाय पर्याय नाही. व्यवसाय किंवा नोकरीत गुंतलेले पालक आपल्या मुलांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत, अशी निरीक्षणे अभ्यासकांनी मांडली आहेत.
वयोवृद्ध पालकांना दूर ठेऊन स्वत: सक्षम आणि विवाहित असणारी मुलेही आज शहरात राहतात. मुलांनाही ज्येष्ठांच्या आधाराची गरज भासत असली तरी, गुंतागुंतीच्या कुटूंबव्यवस्थेत हा दुरावा निर्माण होत आहे. समाजमनावर भक्कमपणे संस्कार घडवणाऱ्या बापाची आज समाजाला गरज आहे, म्हणून वडिलांनी आपल्या मुलांना मुलांनी पित्याला अधिकाधिक वेळ देणे गरजेचे झाले आहे.
आठवड्यातील काही तासच भेटतो बाप : महानगरांमध्येबाप ड्युटीवरून घरी येतो तेव्हा मुले झोपलेली असतात, सकाळी बाप ड्यूटीवर निघतो तेव्हाही मुले झोपलेली असतात. सुटीच्या दिवशी बाप घरी असतो मात्र मुले ट्यूशन आणि इतर क्लासमध्ये व्यस्त असतात. म्हणजे आठवड्याभरात काही तास या मुलांच्या नशीबी बाप नावाचा माणूस असतो. अशा पिता-पुत्रांमध्ये भविष्यात भावनिक ओलावा कायम राहत नाही. पर्यायाने आई वडिलांना एकाकी सोडून राहणे पसंत करण्यास मुले तयार होतात.

मुलांच्या सर्वांगीण विकासावर हाेतो दूरगामी परिणाम
- वडील कुटूंबापासून दूर राहिल्याने ‘कम्युनिकेशन गॅप’ निर्माण होतो वेळप्रसंगी मुलांचा आपल्या वडिलांविषयी गैरसमजही होऊ शकतो. या मुळे कुटूंबातील वातावरण दूषित होते.यातून मुलांच्या सर्वांगीण विकासावर भविष्यात दूरगामी परिणाम होताे.
प्रा. प्रमोद मळसणे, मानसशास्त्र अभ्यासक
मुलांकडे नाहीत बाबा, बाबांकडे नाहीत मुलं : बहुतेक शहरी कुटूंबांमधील मुलांना वेळ द्यायला त्यांच्याजवळ बाबा नाहीत. तर, ग्रामीण कुटूंबात राहणाऱ्या बाबांकडे त्यांची नोकरी करणारे मुले नाहीत. कुटूंबरचनेत दिवसेंदिवस होणारा हा बदल भविष्यात विपरीत परिणाम घडवून आणू शकतो.
बातम्या आणखी आहेत...