आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावरकरांचा १९४३ मध्ये एक दिवस होता अमरावतीत मुक्काम, खापर्डे वाड्यात निवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- १९४३मध्ये स्वा. सावरकर शहरात दाखल झाले, तेव्हा स्थानकावर त्यांचा मोठ्या थाटात सत्कार करण्यात आला होता. डॉ. मुंजे, प्रा. देशपांडे, विश्वनाथराव केळकर यांच्यासोबत त्यांनी हिंदू महासभेची आगामी कार्यकारिणी त्यागपत्र यांबाबत चर्चा केली होती, असा संदर्भही शहराच्या इतिहासात आढळतो. जोग चौकात सकाळी सव्वानऊच्या दरम्यान त्यांंचा सत्कार समारंभ घेण्यात आला होता. डॉ. मुंजे त्या वेळी अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचीदेखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
‘हिंदू समाजाच्या पुनरोद्धाराचे कार्य तडीस नेण्यासाठी परमेश्वर तात्याराव यांच्या कार्यास यश देवो,’ अशी प्रार्थना राष्ट्रसंतांनी केली होती. त्याआधी स्वागतगीत झाले होते. बाबाराव खापर्डे हे त्या वेळी विदर्भ सावरकर सत्कार समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी प्रास्ताविक केल्याचा संदर्भ आहे. शेवटी अध्यक्षीय भाषण झाले. ‘आणीबाणीच्या काळात सावरकर हेच आम्हाला नेते म्हणून हवे आहेत.’
असे उद्गार डॉ. मुंजे यांनी अध्यक्षीय भाषणात काढले होते. सावरकर सन्मान निधीसाठी या वेळी विदर्भातून १८ हजार २४८ रूपये गोळा करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी ‘हव्याप्रम’ला भेट दोन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता ‘चालू युद्ध’ या विषयावर त्यांचे भाषण झाले होते. हिंदू विद्यार्थी संघाने हा कार्यक्रम घेतला होता. पुढे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला त्यांनी भेट दिली. घाटगे यांच्या बीए शिकणाऱ्या विद्यार्थिनीला त्यांनी बक्षीस दिले. दिवसभरातील विविध कार्यकमांनंतर सायंकाळी ते मुंबईकडे परतले होते
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, शहराच्या इतिहासात आहे याची नोंद...