आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी सुटीमध्ये प्रेक्षक वळले मोठय़ा पडद्याकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- दिवाळीच्या सणानिमित्त सलग सुट्यांच्या चौथा दिवस अमरावतीकरांनी मोठय़ा पडद्यावरील चित्रपट बघून साजरा केला. यामध्ये क्रिश- 3 या चित्रपटाकडे प्रेक्षकांचा कल सर्वाधिक असल्याचे दिसून आले.

सोमवारी पाडव्याच्या दिवशी शहरातील सर्वच चित्रपटगृहांवर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे शहरातील नऊपैकी सात चित्रपटगृहांत क्रिश-3 हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. दिवाळीचा आनंद साजरा करीत असताना सोमवारी मोठय़ा पडद्याच्या चित्रपटगृहांकडे प्रेक्षक वळले असल्याचे चित्र दिसत होते. सध्या घराघरांत असलेल्या टेलिव्हिजनवर केबलच्या माध्यमातून दिसणार्‍या चॅनेल्स बघण्याकडे प्रेक्षकांचा ओढा असतो. मात्र, ऐन दिवाळीत मोठय़ा पडद्याला प्रेक्षकांनी पसंती दाखवली आहे. राकेश रोशन निर्मित आणि दिग्दर्शित असेलल्या या चित्रपटात ऋतिक रोशन, विवेक ओबेरॉय, प्रियंका चोप्रा आणि कंगना राणावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सन 2003 मध्ये ‘कोई मिल गया’, 2006 मध्ये ‘क्रिश’ आणि त्यानंतर आता क्रिश-3 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची गर्दी खेचतोय. हा चित्रपट बघण्यासाठी युवक अणि युवतींची मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे.