आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sport Ground News In Marathi, Sport Ground Layout Issue At Amravati, Divya Marathi

ले-आउटपेक्षा मैदाने निम्म्याने कमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- मनपा क्षेत्रात सुमारे दोन हजारांवर ले-आउट आहेत. लोकसंख्या ही किमान दहा लाख असली, तरी मैदानांची संख्या साडेअकराशेपेक्षा जास्त नाही. याचाच अर्थ शहरात निम्म्याने मैदानं कमी आहेत. त्यातही क्रीडांगण किंवा विकसित मैदानांची संख्या तर बोटांवर मोजता येण्याइतपत रोडावलेली आहे. शासनाने मैदानांचे क्रीडांगणांमध्ये रूपांतर करण्यासाठी अध्यादेश जारी केला असताना, त्याचा लाभ कोणीही घेतला नाही. परिणामी मैदानांचे क्रीडांगण बनू शकले नाही. तथापि, क्रीडांगणांचे रूपांतर भकास मैदानांमध्ये वेगाने झाले आहे.

मनपा फार तर एखाददुसरे मैदान विकसित करू शकते. त्यामुळेच शासनाने मैदाने विकास करण्यासाठी नाममात्र शुल्कावर खाजगी संस्थांना देण्याचा निर्णय घेतला. यामागे मनपाचा आर्थिक बोजा कमी होईल, मैदानांची देखरेख होईल, हाच मुख्य उद्देश होता. जेवढे मैदान असेल, त्याच्या 90 टक्के जागा क्रीडांगण किंवा उद्यानांची निर्मिती अशा विकासकामांसाठी अन् 10 टक्के जागा अन्य शासकीय कामांसाठी राखीव ठेवावी, असा शासनाचा निर्णय आहे.

मैदानांची दुर्दशा टाळण्यासाठी दोन-तीन वर्षांपूर्वी नगरसेवक प्रदीप बाजड यांनी मनपाच्या आमसभेत विषय मांडला होता. मैदानांवर किंवा त्याच्या सभोवताल अतिक्रमण नियंत्रणासाठी कारवाई करीत असतो. तक्रारी आल्यानंतर अतिक्रमण हटाव पथक पाठवून ते मोकळे केले जाते. यासाठी केवळ आमच्यापर्यंत अतिक्रमण झाल्याची माहिती पोहोचणे आवश्यक असते, अशी माहिती मनपा विभागाचे सहायक आरेखक व जागा निरीक्षक गणेश कुत्तरमारे यांनी दिली.

ले-आउटची संख्या
1150 मैदानांची संख्या
2000 पेक्षा जास्त

दसरा मैदान, जयहिंद (बडनेरा), नवोदय विद्यालय (नवसारी), अन्य खुली मैदाने अंबापेठ, बालाजी प्लॉट, पन्नालालनगर, अंबिकानगर, रुक्मिणीनगर, विजय कॉलनी, रविकिरण सोसायटी, महाराष्ट्र बँक कॉलनी, भटवाडी, सहकारनगर, राधानगर, सावता मैदान (बडनेरा), झिरी (बडनेरा), तसेच शहरातील अभिन्यासातील मोकळ्या जागा. त्यापैकी राठीनगर येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे.