आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sport News In Marathi, Become A Good Bowler From Amravati, Divya Marathi

पन्नास हजार खचरून घडवणार वेगवान गोलंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावती जिल्ह्यात वेगवान गोलंदाज घडवण्यासाठी जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेने कंबर कसली आहे. त्यासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर 50 हजार खचरून उसळी घेणारी वेगवान खेळपट्टी करण्यात आली आहे.

चेंडूला वेग, नैसर्गिक स्विंग आणि उसळी मिळावी, यासाठी अधिक हिरवळ (टर्फ) ठेवण्यात येणार असल्याचे खेळपट्टी तज्ज्ञ व जिल्हा हौशी क्रिकेट संघटनेचे सचिव दीनानाथ नवाथे यांनी सांगितले. यापूर्वी नेट्स लावून सिमेंटच्या दोन खेळपट्टय़ांवर नवोदितांचा सराव व्हायचा. यापुढे टर्फ विकेटवर सराव होणार असल्याने गोलंदाज, फलंदाजांना मुख्य खेळपट्टीवर अपेक्षित कामगिरी करता येईल, अशी आशाही प्रा. नवाथे यांनी व्यक्त केली आहे.

चार मुख्य व सहा सराव खेळपट्टय़ा झाल्या सज्ज
40 फूट रुंद आणि 100 फूट लांबीची एक मोठी विकेट तयार करण्यात आली असून, यात 10 फूट बाय 66 फुटाच्या चार मुख्य खेळपट्टय़ा बसतात. यावर दाट हिरवळ राहावी म्हणून बर्म्युडा गवताचे पॅच बसवण्यात आले आहेत. मुख्य खेळपट्टीची उरलेली माती आणि बर्म्युडा गवत वापरून 60 फूट रुंद व 40 फूट लांबीच्या पॅचमध्ये सहा सराव खेळपट्टय़ा मैदानाच्या पूर्वेकडे तयार करण्यात आल्या आहेत.