आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंसमोर असुविधांचा डोंगर, किमान गरजेच्‍या सोयीसुध्‍दा नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातून शालेय क्रीडा मोसमात सुमारे १५ हजार खेळाडू ८२ क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत असतात. मात्र, विभागीय क्रीडा संकुल अन् एचव्हीपीएम वगळता अन्य मैदानांवर किमान गरजेच्या सोयीही उपलब्ध नसल्याने खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक पालकांची गैरसोय होत आहे. बहुतेक स्पर्धांदरम्यान पिण्याचे पाणी, टॉयलेट, चेंजिंग रूम, प्रथमोपचार नसल्याच्या तक्रारी खेळाडू, प्रशिक्षक, पालक करत असतात.
खेळाडूंकडून राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरीची अपेक्षा करण्यात येते. मात्र, खेळाडू जोवर मुंबई किंवा दिल्ली येथे जाऊन खेळत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या डोळ्यांसही प्राथमिक खेळ सुविधाधा दिसून येत नाहीत. खड्डेमय मैदानावर धावताना बहुतेक खेळाडू जखमी होतात. कारण, अशा जमिनीवर जोडे घालून धावले, तर तोल जाऊन खाली कोसळण्याचा धोका असतो. अशा मैदानांमुळे खेळाडू अॅथलेटिक्‍स स्पर्धेत धावत असतील, तर अंगी कौशल्य असूनही ते अपेक्षेनुसार कामगिरी करू शकत नाहीत. अमरावतीने जलतरण, बॅडमिंटन, क्रिकेट, टेबल टेनिस, १० मीटर एअर रायफल, लॉन टेनिस, स्केटिंग अन् धनुर्विद्या या खेळात चांगली प्रगती केल्यानंतरही सर्वसाधारण सुविधाधाच उपलब्ध आहेत. इतर खेळ कसेतरी खेळायचे म्हणून वेळ निभावून नेण्यात येते. खेळ बघण्यासाठी काही वेळा निवांत बसावे लागते. मात्र, बहुतेक मैदानांवर बसण्याचीही व्यवस्था नसल्याचे दिसून येते.
नव्या-जुन्याशंभर खेळांच्या स्पर्धा : आधीपासूनचे ऑलिम्पिक दर्जाचे अन् मागील वर्षी नव्याने समाविष्ट झालेल्या खेळांमुळे जिल्‍हा शालेय क्रीडा स्पर्धेत एकूण खेळांची संख्या ८२ वर पोहोचली आहे. १४, १७ १९ वर्षांखालील मुलं मुलींच्या तीन वयोगटांत या स्पर्धा घेण्यात येतात. याशिवाय विभागीय, राज्यस्तरीय, पायका, महिला, नेहरू चषक हॉकी, अशा सुमारे शंभर खेळांच्या स्पर्धांचे आयोजन होत असते, मात्र, केवळ २५ टक्केच खेळांसाठी बऱ्यापैकी सोयी उपलब्ध आहेत. उर्वरित ७५ टक्के खेळांबाबत प्राथमिक खेळ सुविधाधांच्या नावाने दुष्काळच आहे.
जिल्‍हास्‍टेडियम, सायन्सकोरवर नाही प्रसाधनगृहांची सुविधा
जिल्‍हास्‍टेडियम सायन्सकोरवर बहुतेक सर्व मोठ्या स्पर्धा अन् शासकीय कार्यक्रम होत असतात. येथे प्रसाधनगृहाची (टॉयलेट) सोय नाही. बाजूलाच प्रबोधिनी असल्यामुळे मर्यादित संख्येत खेळाडू असतील तर काम भागते. मात्र, मोठी स्पर्धा असल्यास बाहेरून येणाऱ्या खेळाडूंना असुविधा होते. याची गंभीर दखल जिल्हा क्रीडा संकुल समितीने घ्यावी, अशी खेळाडूंची मागणी आहे. सायन्सकोर मैदान फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, येथे खडीच दिसते. गवत नावालाही नाही. टर्फ लावण्याची तसदी घेतली नाही. पि ण्याचे पाणी, चेंजिंग रूम नाही, बसण्याची व्यवस्था, आणि सुरक्षा कुंपणाच्या नावानेही बोंबच आहे.
*अमरावती जिल्ह्यात क्रीडा संकुल व्हावे म्हणून मी यापूर्वीही प्रयत्न केले आहेत. यापुढेही करणार. मध्यंतरी मैदानांवर बऱ्याच असुविधाधा निर्माण झाल्या आहेत, हे खरे. संकुल उभे राहिले तरच सोयी-सुविधाधा मिळतील. त्यामुळेच खेळाडूंना दर्जेदार सुविधाधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. सुनीलदेशमुख, आमदार,अमरावती.
*शासनाने मागील काही वर्षांमध्ये खेळांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान क्रीडा सुविधाधा, जसे विभागीय, जिल्‍हा तालुका क्रीडा संकुलांचे िनर्माण केले. व्यायाम शाळाही उघडल्या. मात्र, खेळाडूंचा वाढता दर्जा लक्षात घेता, आणखी सुविधाधांना वाव आहे. त्या मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अविनाशपुंड, जिल्हाक्रीडा अधिकारी

मैदानावरील मोठे खड्डे खेळाडूंसाठी धोकादायक.
तक्रार : बहुतेकस्पर्धांदरम्यान पिण्याचे पाणी, टॉयलेट, चेंजिंग रूम, प्रथमोपचार नसल्याच्या तक्रारी खेळाडू, प्रशिक्षक, पालक करीत असतात.
राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे यजमानपद अमरावतीला मिळाले होते. मात्र, अमरावतीत अॅस्ट्रोटर्फ नसल्यामुळे मुंबई, पुण्याकडील विजेत्या जिल्‍हा संघांनी अमरावतीत खेळण्यास नकार दिला. खड्ड्यांच्या मैदानावर खेळायचे नाही, असे सांगून त्यांनी आम्हीच स्पर्धा आयोजित करतो. तुम्ही खेळायला या असे सांगितले अन् स्पर्धा पळवली.