आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंच्या परिश्रमाने पालटले ‘प्रबाेधिनी’चे रूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - खेळाडूंनीस्वत:च परिश्रम घेत पोषक प्रसन्न वातावरणाची िनर्मिती केल्याचे हे बहुदा पहिलेच उदाहरण होय. अमरावती जिल्हा स्टेिडयमवर राज्य शासनाची धनुर्विद्या प्रबोधिनी आहे. येथे मुले मुली वर्षभर धनुिर्वद्या खेळाचे प्रशिक्षण घेत शिक्षणही घेतात. त्यांनी मागील काही आठवड्यांपासून सुटीच्या दिवशी घेतलेल्या परिश्रमामुळे मरगळ आलेल्या ‘प्रबोधिनी’चे रूपच आता पालटले आहे.
प्रवेश करतो त्या परिसरापासून ते वसतिगृह अन् भोजनावळीपर्यंत मुलांनी स्वच्छता नीटनेटकेपणा कायम ठेवला आहे. वाढलेल्या अनावश्यक झाडांना व्यवस्थित आकार देऊन तसेच वाळलेल्या वृक्षांना तोडून त्यांचे शिल्प साकारले आहेत. प्रबाेधिनीतील अनावश्यक कचरा जाळून नष्ट केला. जिल्हा क्रीडा अधिकारी प्रबोधिनीचे प्राचार्य अविनाश पुंड यांच्या पुढाकारातून महिनाभरापासून मोहीम हाती घेण्यात आली असून, डाॅ. सतीश पहाडे, सचिंद्र मिलमिले, योगेश शिर्के, प्रफुल्ल डांगे, ज्ञानेश्वर मोरे, दिनेश चौकडे, अनिकेत पिंपळकर, क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

परिसर सुंदर फूलझाडांच्या कुंड्यांनी सजवण्यात आला आहे.
बाजूला असलेल्या पडीक जमिनी स्वच्छ करून तेथे गुलाब, कॅक्ट््टस, क्रोटन्स अन् िवविध जातींच्या जास्वंद फुलांची झाडे लावण्यात आली.
जिकडे नजर जावी -तिकडे सुबकता दृष्टीस पडावी अन् मन प्रसन्न व्हावे, हाच यामागील मुख्य उद्देश आहे.
स्वच्छता ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. नियमितपणे परिसराची स्वच्छता अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक सुटीच्या दिवशी किंवा रविवारी ही मोहीम राबवण्याचा निर्धार माझ्यासह सर्व खेळाडू प्रबोधिनीच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनीदिली.