आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Srikrsnadhara Pawar Won The International Youth Marathon Competition

इच्छाशक्तीच्या बळावर घडतोय एक ध्येयवेडा धावपटू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगाव सुर्जी- नाकोणी प्रोत्साहक, ना प्रशिक्षक, मात्र दुर्दम्य इच्छा शक्तीच्या बळावर येथील पाचपावली भागात राहणाऱ्या श्रीकृष्ण धारपवार या ३२ वर्षीय युवकाने आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा गाजवली. अठराविश्वे दारिद्र्यात जगत असलेल्या या युवकाने मजूरीच्या पैशातून या स्पर्धेत ऑनलाईन प्रवेश मिळवला. जिंकण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरून त्याने जागतिक पातळीवर २८ वा, देशातून चौथा, राज्यातून तिसरा, तर विदर्भातून प्रथम येण्याचा मानही पटकावला.
अठराविश्वे दारिद्र्या असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या श्रीकृष्णचे वडील व्यवसायाने मच्छिमार आहेत, तर आई एका डोळ्याने अधू. लहानपणापासूनच खेळाची आवड असलेल्या श्रीकृष्णाला आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने पदवीच्या पहिल्या वर्गापासून शिक्षण सोडावे लागले. अकरावी, बारावीत असताना कुस्तीकडे आकर्षिला गेलेला हा खेळाडू मात्र नंतर क्रीडा प्रशिक्षक बिजवे यांच्या मार्गदर्शनाने आंतरमहाविद्यालयीन मॅराथॉन स्पर्धेत उतरला. स्पर्धेत आठवे स्थान पटकावत कलरकोटचा मानकरी ठरलेल्या कृष्णाच्या जीवनाला जणू येथूनच नवीन कलाटणी मिळाली. ‘इंटरनॅशनल प्लेयर’ बनण्याचे ध्येय उराशी बाळगलेल्या या ध्येय वेड्याने आजवर अनेक मॅराथॉन स्पर्धा गाजवल्या. पुणे येथे तास मिनिटे ४१ सेकंदांमध्ये ४२ किमी.ची आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा जिंकली. उदयोन्मुख खेळाडूच्या मदतीसाठी समाजसेवींनी पुढे यावे असे आवाहन श्रीकृष्णच्या मित्र परिवाराने केले आहे.
कधी मोलमजुरी, तर कधी गाढवे
श्रीकृष्णचीपरिस्थिती हालाखीची आहे. त्याही परिस्थितीत त्याची खेळण्याची भावंडानी शिकावे ही जिद्द कायम आहे. त्यासाठी तो हाताला मिळेल ते काम करतो. कधी मोलमजुरी, तर कधी गाढवेही हाकलतो.
मदतीची आवश्यकता
यास्पर्धेत थोडक्यात यश हुकले. पुढची स्पर्धा डिसेंबर २०१५ मध्ये आहे. त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकासह आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यासाठी समाजातील दानशुरांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
- श्रीकृष्णधार पवार, खेळाडू