अमरावती- बसस्थानकाबाहेर वाहतूक नियंत्रणाच्या मुद्यावरून एसटी ड्रायव्हर ट्रॅफिक पोलिसांत झालेल्या वादाचे रूपांतर एसटी वाहकांच्या अचानक बंद मध्ये होऊन विभागातील हजारो प्रवाशांचे पावनेदोन तास हाल झाले. एसटी वाहकाने वाहतूक पोलिसाने मारहाण केल्याचा आरोप केल्यानंतर संतप्त महामंडळाच्या बसचालकांनी अचानकपणे ‘काम बंद’पुकारले. परिणामी, बसस्थानकाला जोडणा-या सर्व मार्गांवर एसटी बसेसच्या लांबच-लांब रांगा लागल्या. दोन ‘खाकीं’च्या वादात प्रवासी नाहक भरडले गेले.
शेख नुरूल्ला शेख नुरूल्ला (३४, अमरावती) हे चांदूरबाजार आगारात बसचालक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास ते चांदूरबाजारवरून बस (क्रमांक एम. एच. ४० ८४२०) घेऊन अमरावतीत दाखल झाले. बसस्थानकाबाहेर वाहतूक नियंत्रणासाठी किशोर बडासे शैलेंद्रसिंग ठाकूर हे ट्रॅफिक पोलिस कार्यरत होते. परिसरात, वाहतूक कोंडी झाल्यामुळे पोलिसांनी ड्रायव्हरला हटकले. यावरून ठाकूर शे. नुरूल्ला यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर, ठाकूर यांनी
आपणांस िशविगाळ करून मारहाण केल्याचा आरोप शे. नुरूल्ला यांनी केला. एसटी ड्रायव्हरला मारहाण केल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी ड्रायव्हरला मारहाण केल्याच्या निषेधार्थ संबंधीत वाहतूक पोलिसांवर कारवाई झाल्याशिवाय एसटी चालणार नाही, गाड्या आहे त्याच ठिकाणी उभ्या राहणार, अशी भूमिका घेतली.
या दरम्यान, बाहेरून येणाऱ्या सर्व बसेस रस्त्यावर उभ्या होत्या. अवघ्या अर्ध्या तासांत बस आगाराला जोडणाऱ्या सर्व मार्गांवर एसटी बसेसच्या रांगा लागल्या. घटनेनंतर दहा मिनिटांच्या आत महामंडलाचे शेकडो कर्मचारी जमले. वाहतूक पोलिसावर कारवाई झाल्यािशवाय एसटीची चाके चालणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे परिस्थिती िचघळली. परिस्थिती आवाक्याबाहेर जाऊ नये, यासाठी तत्काळी पोलिस उपायुक्त बी. के. गावराने, एसीपी अशोक कळमकर, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विजय सांळुके, कोतवालीचे ठाणेदार दिलीप इंगळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिस ताफा बसस्थानकात पोहचला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कारवाईचे आश्वासन देऊन अवधी मागितला.
आंदोलनाने प्रवासी बेजार
आजारी नातेवाईकाला भेटायला आले होते. सोबत कुणी नाही. दिड तासापासून बसेस सुरू होण्याची वाट पाहत आहे. या आंदोलनामुळे सर्वच प्रवासी बेजार झाले आहेत. शैलेजातिडके, प्रवासी,तेल्हारा
अचानकअसा निर्णय घेऊ नये
मीदोन किलोमीटर अंतर कापून बसस्थानकापर्यंत पायी चालत पोहचलो. माझ्यासोबत कुटूंब आहे. लहान मुलं आहेत. आता केव्हा बस लागेल अणि केव्हा घरी जाणार असा प्रश्न पडला आहे. वाद कोणताही असो संबंधीतांनी असा निर्णय घेऊ नये, असे वाटते. विनोदगंद्रे, प्रवासी,कारंजा
१. मध्यवर्ती बसस्थानकास जुळणाऱ्या रस्त्यांवर एसटी बसेसच्या लांब रांगा लागल्या होत्या.
२. काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांना दोन तास ताटकळत बसावे लागले.
३. पोलिसांसमोर फिर्याद मांडताना.
आम्ही अन्याय खपवून घेणार नाही
बसचालकांनावाहतूक पोलिसाने मारहाण केल्यामुळे आम्ही काहीवेळ बसेस उभ्या ठेवल्या. कोणत्याही परिस्थितीत आम्ही अन्याय सहन करणार नाही. आम्ही दोषीवर कारवाईची मागणी केली आहे. रमेशउईके, विभागीयसचिव, मनसे कर्मचारी सं.
गैरसोय टाळण्याचा प्रयत्न
झालेलाप्रकार लक्षात घेता कर्मचाऱ्यांनी बसेस उभ्या केल्या होत्या. माहिती मिळताच आम्ही बसस्थानकात पोहचलो. सर्व प्रथम बसेस सुरू करण्याचे आवाहन कर्मचा-यांना केले. कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय व्हायला नको. प्रकरणाची सखोल माहिती घेत आहे. के.टी. महाजन, विभागीयनियंत्रक.