आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी भाडेवाढीचा सामान्यांना फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शनिवारी (ता. 26) भाडेवाढ जाहीर केली आहे. साध्या परिवर्तन टू बाय टू, रातराणी आणि हिरकणी, शिवनेरी बसने प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना जादा दराने तिकीट घ्यावे लागणार आहे. 31 जुलैपासून ही वाढ लागू होईल.
बस स्थानकापासून शहरातल्या शहरात प्रवास करण्यासाठीदेखील आता 16 किलोमीटरपर्यंत सरसकट एक रुपयाने दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती-बडनेरा मार्गावर जे प्रवासी आवागमन करतात, त्यांनाही एक रुपया जादा मोजावा लागणार आहे.
जवळच्या प्रवाशांना दिलासा : बस स्थानकापासून 30 किलोमीटरच्या आत ज्या फेर्‍या आहेत, त्यांना भाडेवाढ लागू होणार नाही. त्यामुळे भातकुली, धानोरा, लोणी, शिराळा, मार्डी, कुर्‍हा, वलगाव, मोझरी अशा गावांच्या प्रवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे.

काहींना सरसकट वाढ
बस स्थानकापासून 31 किलोमीटरवर आणि त्यावरील सर्व ठिकाणच्या प्रवासासाठी तिकीट दरात सरसकट एक रुपया वाढ करण्यात आली आहे. दीडशे किलोमीटरपर्यंत ही सरसकट वाढ लागू असेल. त्यामुळे नागपूर, अकोला, यवतमाळ, अकोट, अंजनगावसुर्जी, परतवाडा, अचलपूर, चिखलदरा, धारणी, मोश्री, तिवसा, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, पुलगाव येथे प्रवास करणार्‍यांच्या खिशाला फटका बसणार आहे.
तिकीटाचे नवीन दर
अमरावती-परतवाडा

साधी :57
रातराणी :67
हिरकणी :77
अमरावती-मूतिर्जापूर
साधी : 63
रातराणी :74
हिरकणी : 86
नागपूर-अमरावती
साधी : 163
रातराणी : 192
हिरकणी : 222
अमरावती-पुणे
साधी : 619
रातराणी :733
हिरकणी : 222
अमरावती-अकोला
साधी : 106
रातराणी : 126
हिरकणी :146
महागाई 31 ते 150 किमीसाठी एक रुपया वाढ