आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमरावती - लिपिकवर्गीय भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत सुमारे 33 टक्के उमेदवारांची गळती नोंदवली गेली.दोन सत्रांमध्ये झालेल्या या परीक्षेसाठी 16 हजार 800 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यांपैकी 11 हजार 336 जणांनीच परीक्षा दिली. परीक्षार्थ्यांची ही टक्केवारी 67.47 आहे. रविवारी (16 फेब्रुवारी) सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी दोन ते चार, अशा दोन सत्रांत ही परीक्षा घेतली गेली. शहरातील विविध 28 शाळा-महाविद्यालयांमध्ये परीक्षेची तयारी करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रत्येक सत्रात आठ हजार 400 याप्रमाणे एकूण 16 हजार 800 उमेदवार ही परीक्षा देणार होते. मात्र, त्यांपैकी 11 हजार 336 जणांनीच प्रत्यक्ष हजेरी लावली. निवासी उपजिल्हाधिकारी तेजूसिंग पवार यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचार्यांनी जबाबदारी सांभाळली.
रविवारीही परीक्षा
स्टाफ सिलेक्शन कमिशनची ही परीक्षा पुढील रविवारीही घेतली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने तयारी केली असून, येता रविवारही त्यांना परीक्षेच्या कामातच घालवावा लागणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.