आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांना अजूनही मिळाली नाही मदत, राज्य सरकारची आर्थिक मदत म्हणजे लोणकढी थाप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरखेड- नागपूर हिवाळी अधिवेशनात शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली असून, ही आर्थिक मदत अद्यापही तालुक्यातील आपद्ग्रस्त शेतक-यापर्यंत पोहोचली नसून, या शासनाच्या जणू लोणकढीच्या थापा अाहे, अशा संतप्त प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
राज्यात प्रारंभी अल्प पाऊस झाला. त्यामुळे पिकांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी झाली. दुष्काळामुळे शेतातील िपके जमीनदोस्त झाली. मध्यंतरी पुन्हा आलेल्या पावसाने ही पिकेही नष्ट झाली. त्यामुळे सोयाबीन, तूर, कापूस ही पिके नष्ट झाली. तालुक्यात गारपिटीसह पाऊस झाला. अद्यापही पळशी, संगम चिंचोली या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेंगाळला आहे. शासनाकडून पर्यायी व्यवस्था झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अंमलबजावणी झाली नसल्याचे भिजत घोंगडे आहे. केंद्रीय पथकाने औपचारिक दौरा करून काही िमनिटांतच नागेशवाडीचा सर्व्हे आटोपला. पथकाच्या पाहणी दौऱ्यातून शेतकऱ्यांच्या पदरी आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून छदामही पडला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाकडे पॅकेजच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत.
केंद्रीय पथकाची पाहणी आणि नवी आश्वासनेही ठरली फोल
‘नोव्हेंबरआणि डिसेंबर २०१४ मध्ये अवकाळी पाऊस गारपिटीमुळे नागपूर िवभागात २,८८,२६१ बहुभू-धारक शेतकऱ्यांचे ६,२०,२४७.७५ हेक्टरमधील, तर ५,५५,७२६ अल्प अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांचे ५,३७,४९९.२ हेक्टरमधील शेतीपिकांचे नुकसान झाले’,अशी माहिती महसूल िवभागाच्या अहवालात नमूद केली आहे. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत येत्या एक-दोन दिवसांत व्हिडिओ काॅन्फरन्सिंग होणार असल्याचे समजते.
नागपूर विभागात ४६ तालुक्यांतील ४,८५१ गावांतील ५,५५,७२६ अल्प अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले. यामध्ये अल्प अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांचे ४९,१८३.९२ हेक्टरमधील बागायती पिकांचे १३,०८९.१ हेक्टरमधील बहुवार्षिक फळपिकांचे, तसेच ४,७५,२२६.१८ हेक्टरमधील जिरायती पिकांचे नुकसान झाले.
विभागात ४८४३ गावांतील २,८८,२६१ बहुभू-धारक शेतक-यांचे शेतीपिकांचे नुकसान झाले. यामध्ये ५,७१,३०५.५६ हेक्टरमधील जिरायत क्षेत्र, ३७,६८३,.३५ बागायती ११२५८.६३ हेक्टरमधील बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तोंडचा घास हिसकावला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २०१३ आणि आता जानेवारी २०१५ च्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस गारपिटीमुळे कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रातील शेतीिपकांचे कधीही भरून येणारे नुकसान झाले. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०१४ मध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करून केंद्रीय पथकाने आपला अहवाल सादर केला. हिवाळी अधिवेशनात केंद्रीय पथकाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या गावांच्या संख्येत वाढ केली. मात्र, त्यानंतर अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.