आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत गोिवंद, अामीरला ‘सुवर्ण’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - यवतमाळ येथे ते डिसेंबर या कालावधीत झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत गाेिवंद कपाटे, आमीर अब्दुल यांनी राज्यातील दिग्गज मल्लांना लोळवून दोन सुवर्णपदकांची कमाई केली. अमरावती जिल्ह्याला राज्य शालेय कुस्ती स्पर्धेत मिळालेले हे ऐतिहासिक यश होय.

गोिवंद कपाटेने १७ वर्षांखालील ४२ किलो वजन गटात कोल्हापूरच्या मातब्बर पहिलवानाला आकाश दाखवून सोनेरी पदकावर नाव कोरले. तत्पूर्वी त्याने पुणे, नाशिक, औरंगाबाद विभागाच्या कुस्तीपटूंना नमवून हे यश संपादन केले. आमीर अब्दुलने १९ वर्षांखालील वयोगटातील ४६ वजन गटात पुण्याच्या मल्लाला चीत करून विजेतेपद पटकावले. तत्पूर्वी त्याने कोल्हापूर, लातूर, औरंगाबादच्या पहिलवानांना धूळ चारली होती.

१७ वर्षांखालील वयोगटात ४६ वजन गटात सचिन तोरकडने कांस्यपदक जिंकले. दिलीप तांभारेने १९ वर्षांखालील ४२किलो वजन गटात तृतीय क्रमांक पटकावला. राहुल तिडकेने १९ वर्षांखालील ६६ किलो वजन गटात अन् गोिवंद विरुळकरने १७ वर्षांखालील ६३ किलो वजन गटात तिसरा क्रमांक मिळवला. प्रशिक्षक जितेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ येथे सहाही मल्लांनी ही देखणी कामगिरी केली. एचव्हीपीएम येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्रात हे सर्व उदयोन्मुख कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक प्रा. संजय तीरथकर, प्रा. मनोज तायडे, रणबीरसिंग राहल, जितेंद्र भुयार, समीर देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनात नियमितपणे सराव करीत असतात. स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, सचिव प्रा. माधुरी चेंडके, डीसीपीई प्राचार्य डाॅ. सुभाषचंद शर्मा, मंडळाचे संचालक डाॅ. सुरेश देशपांडे, माजी प्राचार्य वसंत हरणे, एचव्हीपीएम अभियांत्रिकी महािवद्यालयाचे संचालक डाॅ. श्रीकांत चेंडके, प्रा. विश्वास कोडेस्वार, प्रा. रवि खांडेकर, विभागीय उपसंचालक डाॅ. जयप्रकाश दुबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
प्रथमच राज्य स्पर्धेत दणकेबाज कामगिरी
आंतरराष्ट्रीय पहिलवान अनिल तोरकडच्या पावलावर पाऊल टाकत प्रथमच गोिवंद कपाटे आमीर अब्दुल यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि अमरावती विभागाला असे दमदार यश मिळवूनदिले. याआधी केवळ अनिल तोरकडने राज्य राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. या वेळी दोन कसलेल्या पहिलवानांनी सुवर्ण अन् चौघांनी कांस्यपदक जिंकून अमरावतीला मोठे यश मिळवूनदिले आहे. पहेलवानांच्या या गौरवास्पद कामगिरीत प्रशिक्षक प्रा. संजय तीरथकर, प्रा. मनोज तायडे, रणबीरसिंग राहल जितेंद्र भुयार यांनी पहिलवान घडवण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाचाही मोठा वाटा आहे.