आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी भंगार होत नाहीत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सापकात टाकल्यानंतर ज्याप्रमाणे तरुण होतो. त्याचप्रमाणे एसटीदेखील कधीही भंगार होत नाहीत, असा अजब दावा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. रस्त्यावर धावणाऱ्या एसटीचे आठ वर्षांनंतर सर्वच आवश्यक पार्ट्स बदलले जातात, त्यामुळे एसटी भंगार झाली, हे म्हणणे चुकीचे आहे, असा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, अनेक वर्षांपासून वयोमर्यादा झालेल्या एसटी धावत आहेत. वारंवार ‘ब्रेक डाउन’, टायर फुटणे, खिळखिळे झालेले पार्ट्स, अशी बसेसची स्थिती झाली आहे. नवीन गाड्यांच्या अभावी स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांना उपलब्ध गाड्यांची पुन्हा दुरुस्ती, रंगरंगोटी करून चालवाव्या लागत असल्याचे समजते.
कदाचित त्यामुळेच अधिकाऱ्यांना नाईलाजास्तव एसटी भंगार होत नाहीत, असा अजब दावा करावा लागला असेल. अमरावती जिल्ह्यातील आठ आगारांमधील ४४४ बस वाहनांपैकी ४२ वाहनांना आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, जोपर्यंत एसटी बसमध्ये २२ प्रकारचे अत्यावश्यक पार्ट्स असणार नाहीत, तोपर्यंत त्या चालणार नाहीत, या मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेने नुकतेच कामबंद आंदोलन केले होते. यामध्ये पाच कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. या समस्येवर महिनाभरात तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्यानंतर कामबंद मागे घेण्यात आले होते. मात्र, तरीसुद्धा परिस्थितीमध्ये बदल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
विभागीय कर्मशाळेत यांत्रिकीच्या ७५५ जागा मंजूर आहेत. त्यांपैकी ३७८ यांत्रिकी कार्यरत असून ३७७ जागा रिक्त आहेत. मागील तीन वर्षांपासून जागा भरण्यात आलेल्या नाहीत. अपुऱ्या मनुष्यबळाचाही अधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. याशविाय, आगारातील प्रशासनाने एसटीची योग्य काळजी घेतल्यास अनेक समस्यांपासून आपसूकच सुटका मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.
एसटीच्या विभागीय कर्मशाळेमध्ये गाड्यांची संपूर्ण दुरुस्ती करण्यात येते. दर महिन्याला येथील कर्मशाळेत १२ एसटी बसेस ‘आरसी’ करण्यात येते. २० गाड्या आरटीओकडे तपासणीसाठी जातात. इंजिन, अॅक्सल, आसन दुरुस्ती करणे यांसह पेंटिंगची कामे होतात. येथेच टायर िरमोल्ड प्रक्रिया होेते. एखाद्या एसटी बसला आठ वर्षे पूर्ण झालीकिंवा अपघात झाल्यास येथे दुरुस्ती करण्यात येते.
रस्त्यावरील ‘स्पीड ब्रेकर’ खड्ड्यांच्या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिकाजिल्‍हा परिषद यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कुठलीही उपायोजना होत नाही. स्पीड ब्रेकरमुळेही एसटी बसेस खिळखिळ्या होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एसटी बसेसची वयोमर्यादा आठ वर्षे असली, तरी स्पीड ब्रेकरमुळे लवकरच ही वाहनं खिळखिळी होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
एसटीमध्ये प्रवाशांच्या जीविताची पूर्ण काळजी घेण्यात येते. एसटी गाडीची वयोमर्यादा आठ वर्षांची असते. विभागीय कार्यशाळेत एसटीची दुरुस्ती करण्यात येते. आरटीआे नियमानुसारच रस्त्यावरून एसटी धावते. जिल्ह्यातील यंदा तब्बल ९१ बसेसहिंगणा येथून दुरुस्त करून आणल्या आहेत. याशविाय प्रत्येक आगाराला एक बस उपलब्ध झाली आहे. राजेश अडोकार, यंत्रअभियंता, विभागीय कार्यशाळा.