आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Transport Corporation Implement Courlty Week

प्रवाशांना मिळणार सौजन्यपूर्ण वागणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- परिवहन महामंडळाचे ९५ टक्के उत्पन्न प्रवासी वाहतुकीतून होते. प्रवासी हे दैवत असल्याची जाणीव कर्मचाऱ्यांना करून देण्यासाठी आपली प्रतिमा उंचावण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ सौजन्यपूर्ण सप्ताह राबवित आहे. जूनपासून या सप्ताहाला सुरुवात झाली असून १४ जूनपर्यंत हा सप्ताह चालणार आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी यांनी "दिव्य मराठी'ला दिली आहे.
यातून प्रवाशांना आकर्षित करण्याबरोबरच उत्पन्न वाढीवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी चालक, वाहक, वाहतूक िनयंत्रक, पर्यवेक्षक, आगारप्रमुखांना देहबोलीचे मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ते १४ जून, २१ ते सप्टेंबर, २१ ते २७ डिसेंबर आणि २१ ते २७ मार्च २०१६ या कालावधीत हे सप्ताह आयोजित केले जाणार आहेत. चालू आर्थिक वर्षात चार वेळा सौजन्यपूर्ण सप्ताह राबवण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.
ठराविक काळात असे सप्ताह राबवण्यात येत असले तरी कर्मचाऱ्यांमध्ये प्रवाशांविषयी कायमस्वरूपी सकारात्मक मानसिकता बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी सौजन्यपूर्ण वागणूक-मानसिकता बदल हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महामंडळाच्या अधिकाऱ्यांपासून ते चपराशापर्यंत सर्वच जण प्रवाशांना सन्मान, सौजन्य आणि आदर देण्याचा बाणा अंगी रुजवणार आहेत.
प्रवाशांचे स्वागत
सौजन्य सप्ताहाचे औचित्य साधून आगार वाहतूक नियंत्रण केंद्रावर याबाबत फ्लेक्स बोर्ड लावून प्रवाशांचे स्वागत केले जाणार आहे. एसटीच्या विविध कार्यालयांत लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना, प्रवासी आदी अनेक कामांिनमित्त येतात. तसेच ईमेल, पत्र आणि फोनद्वारे संपर्क करत असतात. त्यावेळी त्यांना चांगली वागणूक देऊन महामंडळाची प्रतिमा उंचवण्यात येणार आहे. वाहतूक नियंत्रक ध्वनिक्षेपावरून प्रवाशांचे स्वागत करून त्यांना सुरक्षित प्रवाशांच्या शुभेच्छा देण्यात येईल. चालक, वाहक, वाहतूक िनयंत्रक, पर्यवेक्षक, आगारप्रमुखांना सौजन्याबाबत देहबोली कशी असावी, दूरध्वनीवरील संभाषण कसे असावे आदीविषयी मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे सिया यांनी स्पष्ट केले.
प्रवासी आहे तर महामंडळ आहे
- प्रवाशांच्या सेवेसाठी हे महामंडळाचे ब्रीदवाक्य लक्षात ठेवत प्रवाशांना अधिक सुखकर सुविधा कशा देता येतील किंवा त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, या उद्देश्याने हे अभियान राबविण्यात येत आहे. १४ जूनपर्यंत हे अभियान चालेल. यामध्ये महामंडळाचे सर्वच अधिकारी कर्मचारी प्रवाशांना सौजण्याची वागणूक देतील.
अरुण सिया, विभागीय वाहतूक अधिकारी.