आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीचे सोने घेणाऱ्या दोन सुवर्णकारांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील जे. पी. कोठारी ज्वेलर्समधून चार बुरखाधारी महिलांनी चोरलेले काही सोने विकत घेणाऱ्या मालेगावच्या दोन सुवर्णकारांना पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक करून शहरात आणले आहे. या वेळी मुख्य सूत्रधार सईदाकडून पोलिसांनी ८२ ग्रॅमच्या सहा सोनसाखळ्या जप्त केल्या असून, उर्वरित सोने जप्तीसाठी पोलिस पथक रविवारी पुन्हा तिसऱ्यांदा मालेगावला जाणार आहे.शहरातील कोठारी ज्वेलर्समधून अर्धा किलोच्या सोनसाखळ्या चोरणाऱ्या चार बुरखाधारी महिलांना पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी मालेगावातून अटक केली होती.

आणखी सोने जप्त होणार
सईदाकडून आम्ही ८२ ग्रॅम सोने जप्त केले आहे; तसेच १०५ ग्रॅम सोने विकत घेणाऱ्या दोन सुवर्णकारांना मालेगावातून अटक केली आहे. आणखी सोने जप्त करण्यासाठी आम्ही पुन्हा मालेगावला जाणार आहोत. रियाजोद्दीनदेशमुख, पोलिसनिरीक्षक गुन्हे शाखा.