आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Meat Voice Chancellor About Exam, Divya Marathi

कधी होणार व्हायवा; विद्यार्थी बुचकळ्यात, कुलगुरुंसमोर मांडल्‍या समस्‍या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू जयकिरण तिडके यांच्याशी चर्चा करून विद्यापीठातील एम.पी.एड. भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी तोंडी परीक्षा तत्काळ घेण्यात यावी, अशी मागणी सोमवारी केली. यावर प्रभारी कुलगुरू तिडके यांनी लवकरच समितीची बैठक बोलावून तोंडी परीक्षेचा तांत्रिक मुद्दा निकाली काढण्याचे आश्वासन या वेळी दिले.

विद्यापीठातील एम.पी.एड. भाग दोनची परीक्षा नऊ मे रोजी संपली. त्यांना प्रोजेक्ट व डेझर्टेशन 14 एप्रिलपर्यंत सादर करणे बंधनकारक होते. विद्यार्थ्यांनी ते सादरही केले. त्यानंतर 21 दिवसांच्या आत आक्षेप व त्रुटींचा कालावधी होता. मात्र, या कालावधीत विद्यापीठाने कुठलाही निर्णय घेतला नाही. तोंडी परीक्षा न झाल्याने विद्यार्थी अजूनही अडकून पडले आहेत. नव्याने पत्र काढून विद्यार्थ्यांना परत एकदा डेझर्टेशन सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
विद्यापीठाने केली दिशाभूल
आतापर्यंत विद्यापीठाकडून सतत दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर न्याय्य मागण्यांसाठी प्रभारी कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके यांच्याशी चर्चा केली आहे. जी. एम. डार, एम.पी.एड. विद्यार्थी.

वडिलांचे झाले नाही अंत्यदर्शन
केव्हा एकदाची तोंडी परीक्षा संपते आणि गावी जातो, याची चिंता सतावत आहे. दरम्यान, वडिलांचा मृत्यू झाला; परंतु त्यांना शेवटचे बघण्याची इच्छाही अपुरी राहिली, हे सांगताना इर्शाद परेच्या डोळ्यांत अर्शू तरळले.

अकारण सहा हजार रुपयांचा भुर्दंड
लेखी परीक्षा झाली असून, केवळ तोंडी परीक्षेसाठी (व्हायवा) सर्व विद्यार्थी अडकून पडले आहेत. बहुतांश विद्यार्थी राज्याबाहेरील असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. महिन्याकाठी विनाकारण सहा हजार रुपये खर्ची पडत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.