आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Organisation Gifted Pistol To Girish Mahajan

मंत्र्यांना पाठवले "पिस्तूल", जलसंपदामंत्र्यांच्या कृतीचा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतर्फे निषेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दहादिवसांपूर्वी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी कमरेला पिस्तूल लावून जळगाव येथील मूकबधीर विद्यार्थ्यांसमोर भाषण केले होते. या कृतीच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.९) जिल्ह्यातील राष्ट्रवादी वदि्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवासीउपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत लहान मुले खेळण्याचे पिस्तूल पाठवून मंत्र्यांना अनोखी भेट दिली.

जळगावमधील मुकबधीर विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात गिरिश महाजन कमरेला पिस्तूल लावून उपस्थित होते. शालेय वदि्यार्थ्यासमोर मंत्री म्हणून वारताना कमरेला बंदूक लावून भाषण करणे अतिशय खेदाची निंदनीय बाब आहे. मंत्री महोदयांनी आम्ही भेटरुपी पाठवलेल्या खेळण्यातील पिस्तूलाने सराव करावा, त्यानंतर गरज पडल्यास आम्ही त्यांना मोठी बंदूक भेट देऊ, अशा उपहासात्मक शब्दात राष्ट्रवादी वदि्यार्थी काँग्रेसने मंत्र्यांच्या वर्तनाचा निषेध केला आहे. मंत्री महोदयांनी कमरेला पिस्तूल बाळगल्याने वदि्यार्थ्यापासून त्यांना धोका होता ,असा चुकीचा संदेशसुद्धा यावेळी गेला,असे निवेदनात नमूद केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे निवासीउपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर यांच्यामार्फत पिस्तूल पाठवण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी वदि्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुशील गावंडे, शिवाजी बुरंगे, नरिज टवानी, विक्की खारोडे, रुपेश काळे, शुभम देशमुख, अमोल पाटील, शुभम होले यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते.

वागणूक योग्य नाही
जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांनी विद्यार्थ्यांसमोर कमरेला बंदूक लावून भाषण दिले. ही बाब अशोभनीय आहे. याच बाबीचा निषेध नोंदवण्यासाठी गुरूवारी आम्ही आरडीसींमार्फत जलसंपदामंत्र्यांना लहान मुले खेळण्याचे पिस्तूल भेट म्हणून पाठवले आहे.
- सुशीलगावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना,अमरावती.
फोटो - आरडीसींना निवेदनदेऊन बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी वदि्यार्थी संघटनेचे पदाधिकारी