आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीस शाळांमध्येच ‘जामर’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सामाजिक न्याय विभागाकडून मिळणार्‍या शिष्यवृत्तीसाठी अमरावती जिल्ह्यातून तब्बल 50 हजार 62 अर्जांचा खच लागला आहे. अकरावी आणि बारावीत शिकणार्‍या कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतून आतापर्यंत अवघी दोन प्रकरणे मंजूर झाली आहेत. या गटातून सुमारे 1291 अर्ज सामाजिक न्याय विभागाला प्राप्त झाले. विशेष म्हणजे, ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 31 ऑक्टोबर असतानाही बहुतांश अर्ज शाळा-महाविद्यालयांच्या पातळीवर प्रलंबित आहेत.

शिष्यवृत्तीची प्रकरणे तातडीने पाठवण्याबाबत सामाजिक न्याय विभागाने शाळा-महाविद्यालयांना सक्त सूचना दिल्या आहेत. अर्ज ऑनलाइन भरायचा असल्याने प्रत्येक शाळा-महाविद्यालयाचा स्वतंत्र इंटरनेट यूजरनेम, पासवर्ड देण्यात आला आहे. प्राप्त होणार्‍या अर्जांची अद्ययावत माहिती दर तासाला प्रकाशित केली जात आहे. त्यानंतरही बहुतांश अर्ज स्थानिक पातळीवरच रखडले आहेत. समाजकल्याण विभागाचे उपायुक्त, समाजकल्याण अधिकार्‍यांनाही शाळा-महाविद्यालयांकडूनच हे अर्ज मागवून घेण्यासाठी कामी लावण्यात आले आहे.