आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Students Abandon Food News In Marathi, Divya Marathi

विद्यार्थ्यांचा अन्नत्याग; अधिकार्‍यांचा मात्र ‘वीक एन्ड’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- निंभोरास्थित सामाजिक न्याय भवनात कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये शनिवारी रात्री निर्माण झालेला वाद अद्यापही कायमच आहे. शनिवारी रात्री दहापासून सुरू झालेले विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन 36 तासांनंतरही सुरूच आहे.

महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार लागून आल्याने उपाशी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत अधिकारी ‘वीक एन्ड’ साजरा करण्यात व्यस्त होते. मेस कंत्राटदाराचे कर्मचारी विद्यार्थ्यांच्या अंगावर चालून गेल्याने सुमारे तीनशे विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. वसतिगृहाच्या गृहपाल सुनीला झोड कौटुंबिक सोहळ्यासाठी दोन दिवसांच्या सुटीवर आहेतत्यामुळे प्रसारमाध्यमांतील बातम्या वाचून समाजकल्याण विभागाचे अधिकारी तत्काळ हा पेच सोडवण्यासाठी वसतिगृहात दाखल होतील, असे अपेक्षित होते. मात्र, एकाही अधिकार्‍याला उपाशी असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, असे वाटले नाही.

..तोवर अन्न घेणार नाही : मेस कंत्राटदार विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तन करतो. त्यामुळे कंत्राटदार बदलला जात नाही, तोवर अन्न घेणार नाही, असा निर्वाणीचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. परिणामी, पेच आणखी वाढला आहे.