आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धा २५ जुलैपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- भरगच्च शालेय क्रीडा मोसमाला यंदा २५ जुलैपासून सुरुवात होत आहे. सुब्रतो चषक फुटबॉल स्पर्धेद्वारे मोसमाला सुरुवात होईल. कारण ऑगस्ट महिन्यात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित होत असते. तत्पूर्वी जिल्हा अन् विभाग स्तरावरील फुटबॉल स्पर्धा आटोपावी लागते. तसाही पावसाळा हाच फुटबाॅलसाठी उपयुक्त काळ समजला जातो. त्यामुळे मुलांना हिरव्या मैदानावर फुटबॉल खेळण्याचा आनंदही लुटता येतो.
बहुतेक क्रीडा स्पर्धा या जिल्हा स्टेडियम आणि विभागीय क्रीडा संकुलात आयोजित केल्या जाणार आहेत. याशिवाय टेनिक्वाॅईट, कुस्ती, क्रिकेटचे सामने, जिम्नॅस्टिक्स, जलतरण, पाॅवर लिफ्टिंग या खेळांच्या स्पर्धा एचव्हीपीएम मध्ये, फुटबॉलचे सामने सायन्सकोर मैदानावर, कबड्डीच्या लढती शिवाजी बहुउद्देशीय महाविद्यालयात, हॅण्डबाॅल, डाॅॅजबाॅल, बाॅल बॅडमिंटन शिवाजी विधि महाविद्यालयाच्या मैदानावर घेतले जाणार आहेत.
बाॅक्सिंग, व्हाॅलीबाॅल शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात, तायक्वांदोच्या लढती तक्षशिला महाविद्यालयात आयोजित केल्या जाणार आहेत. विविध क्रीडा स्पर्धांचे प्रमुख म्हणून नरेश बुंदेले, प्रदीप शेटीये, संजय कथळकर, भास्कर घटाळे, अनिल बोरवार, सचिंद्र मिलमिले, योगेश शिर्के, दर्शना पंडित, पुरुषोत्तम दारव्हणकर यांची नियुक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्पर्धा समन्वयक म्हणून डाॅ. सूरज येवतीकर, प्रमोद चांदूरकर, डाॅ. हनुमंत लुंगे, प्रा. संजय तीरथकर, नितीन चवाळे, जयंत देशमुख, डाॅ. लक्ष्मीकांत खंडागळे, डाॅ. योगेश निर्मळ, प्रा. प्रतिमा बोंडे, मंगेश व्यवहारे, प्रदीप मुगल, महावीर धुळधर, ललीत ढोके, अजय केवाळे, माल्कम मोझेस, विश्वास जाधव, श्याम भोकरे आदी काम बघतील.
स्पर्धेचा व्यस्त कार्यक्रम
शालेयक्रीडा स्पर्धेत सुमारे १०० विविध खेळांच्या मुले मुलींच्या गटात स्पर्धा आयोजित करायच्या असल्यामुळे यंदा फारच व्यस्त कार्यक्रम राहणार आहे. प्रत्येक खेळाची स्पर्धा पूर्ण करण्यासाठी किमान दोन दिवस लागतात. त्यामुळे एकापाठोपाठ एक खेळांच्या स्पर्धा होणार असल्याने यंदा कोणालाही फारशी उसंत मिळणार नाही.
संग्रहित

अनेक खेळांबद्दल खेळाडूही अनभिज्ञ
शासनानेशालेय क्रीडा स्पर्धेत गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर २० नव्या क्रीडा प्रकारांचा समावेश केला. मात्र त्या खेळांबद्दल खेळाडूंनाही फारशी माहिती नाही. यापैकी अनेक खेळांचे नावही ऐकले नाही.राज्यातील पारंपरिक खेळांना प्रायोगिक तत्त्वावर खेळण्याची अनुमती दिली असती, तर सर्वांना त्यांचा आनंद घेता आला असता, असे मत बहुतेक क्रीडा तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
२७ नव्या खेळांचा आहे यंदा समावेश
चाॅयक्वांदो,जम्परोप, फुटबॉल टेनिस, सायकल पोलो, पिकलबाॅल, रस्सीखेच, साॅफ्टटेनिस, ट्रॅडीशनल रेसलिंग, कुडो, शूटिंगबाॅल, पेंटयाक्यू, सिलम्बंब, अष्टे डू आखाडा, संगीत खुर्ची, हाफकिडो बाॅक्सिंग, टेनिस व्हाॅलीबाॅल, बुडो मार्शल आर्ट, कुराश, चाॅकबाॅल, रग्बी, स्पीडबाॅल, तेंग सु डो, जित कुने दाे, फ्लोअर बाॅल, डान्स स्पोर्ट, माॅन्टेक्स बाॅल क्रिकेट आणि लगोरी.