आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुकळीगावाचा प्रश्न सोडवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दर्यापूर तालुक्यातील शहानूर नदीच्या परिसरातील सुकळी गावात निर्माण झालेली भूस्खलनाची समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य राहील, अशी ग्वाही देत ग्रामस्थांनी अन्य ठिकाणी राहण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी सुकळी गावाच्या समस्या जाणून घेताना उपरोक्त आवाहन केले. खासदार आनंदराव अडसूळ, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, भूजल सर्वेक्षणचे उपसंचालक अजय कर्वे आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती होती. सुकळी येथे भूस्खलनामुळे जे ५६ कुटुंब अडचणीत आले आहेत. त्यांना तातडीने राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. मात्र, यासाठी योग्य जागेचा शोध ग्रामस्थांनी घ्यावा, यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी संबंधित अधिकाऱ्यासमवेत सुकळी गावाला भेट देऊन पाहणी करतील. दरम्यान, जागा उपलब्ध झाल्यास समस्याग्रस्त कुटुंबाचा प्रश्न सोडवण्याची कार्यवाही शक्य तितक्या लवकर केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.
नदीपात्रात बदल : शहानूरनदी ही पूर्णा नदीची उपनदी आहे. मात्र, गेल्या २००७, २००९ २०१५ ला नदीच्या पात्रात बदल झाल्याचे सांगून नदीच्या उत्तरेला पुनर्वसन करणे योग्य राहील, अशी माहिती डॉ. विवेक काळे यांनी यावेळी दिली.

तात्पुरते निवारे उभारण्याची तयारी
कुटुंबांचे पुनर्वसन हाच योग्य उपाय
गावकऱ्यांनी पुनर्वसन होण्यायोग्य जागेची निवड करावी. तेथील भूसंपादन करून तात्पुरते निवारे उभारण्याची व्यवस्था करण्यात येईल. किरणगित्ते, जिल्हाधिकारी.
सुकळी गावातील भूस्खलनावर उपाययोजना म्हणून शहानूर नदीच्या पात्रात पूरसर्वेक्षक भिंत बांधून उपयोग होणार नाही, तर गावातील कुटुंबांचे पुनर्वसन करणे योग्य राहील. आनंदराव अडसूळ, खासदार.अमरावती.