आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात सूर्य कोपला, आकोला ४४.७ आंश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मार्च आणि एप्रिलमध्ये आवकाळी पाऊस गारपिटीमुळे विदर्भात उन्हाळा जाणवला नाही. ऐन उन्हाळ्यात जुलैचा आनुभव देणारे वातावरण होते. मात्र, मेमध्ये उन्हाने आनुशेष भरून काढायचे ठरवले आहे. शुक्रवार, मे रोजी विदर्भात पारा ४४ आंश शतांश इतका होता. गरम हवेच्या झळांनी नागरिक होरपळून निघाले. मेमध्ये तसेही ऊन चांगलेच तापते. तसे ते तापायला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवते. पहाटे साडेपाचलाही चक्क उजाडते.

ऊन आणि गर्मीमुळे लोकांनी कामाशिवाय दुपारचे बाहेर पडणे कमी केले आहे. कूलर पंखे चोवीस तास सुरू राहतात. शुक्रवार, मे रोजी विदर्भात आकोला येथे सर्वाधिक ४४.७ आंश शतांश तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात पारा चढायला सुरुवात झाली आहे. नागपूरमध्ये कमाल ४४ आंश शतांश इतके तापमान २००४ मध्ये ५मे रोजी नोंदवण्यात आले होते. २०१३ वर्ष हे सर्वाधिक गरम होते.

आकोल्यात २०१० मध्ये सर्वाधिक
आकोल्यात २०१० मध्ये सर्वाधिक कमाल ४७.२ आंश शतांश तापमान नोंदवण्यात आले. २००९ : ४६, २००७ : ४५.४, २००६ : ४५, २००५ : ४६ आंश शतांश इतके तापमान नोंदवण्यात आले. ४४.८ आंश शतांश इतके तापमान यापूर्वी २०१२ मध्ये नोंदवण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...