आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणला ‘फटाके’, प्रलंबित मागण्यांसाठी कार्यालयात ठिय्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अचलपूर,चांदुरबाजार तालुक्यांतील विजेची समस्या सोडवण्यासाठी देण्यात आलेल्या ‘अल्टिमेटम’ची पूर्तता केल्यामुळे ‘प्रहार’ने अमरावतीमध्ये महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात फटाके फोडून अधिकाऱ्यांपर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांनी अधीक्षक अभियंत्यांसमोर आक्रमकपणे समस्या मांडल्या. विजेअभावी, बळीराजाच्या हातातून शेतपीक जात असल्याचे सांगून प्रश्नाची गंभीरता लक्षात आणून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधीक्षक अभियंता दिलीप घुगल यांच्या पुढ्यात टेबलवर संत्री फेकली. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत उठणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगरचे प्रभारी ठाणेदार खंडेराव ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासभराच्या चर्चेनंतर अधीक्षक अभियंत्यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले. त्यानंतर, आंदोलन मागे घेण्यात आले.
चांदूरबाजार तालुक्यातील माधान, घाटलाडकी, आसेगाव येथे ट्रान्सफॉर्मर बसवावे; आसेगाव करजगाव १३२ के. व्ही.चे उपकेंद्र सुरू करावे; हिरुळपूर्णा, हरम, मेघनाथपूर येथे ३३ के. व्ही.चे नवीन उपकेंद्र सुरू करावे; मंजूर झालेल्या डीबी कार्यान्वित कराव्या; भारनियमनाची पूर्वसूचना देता बदलण्यात आलेली वेळ पूर्ववत करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. प्रहारचे चांदूर बाजार तालुका प्रमुख राजेश वाटाने, मंगेश देशमुख कार्यकर्त्यांसह तीन दिवंसापूर्वी अधीक्षक अभियंत्यांकडे आले होते. पूर्तता झाल्यास अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यातील महावितरणच्या कोणत्याही कार्यालयास डेरा घालण्यात येईल, असा इशारा िदला होता. मात्र, पूर्ततेअभावी शनिवारी दुपारी ‘प्रहार’चे कार्यकर्ते शेतकऱ्यांसह महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयात पोहोचले. या वेळी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. भारनियमन अनियमित वीजपुरवठ्याअभावी पिकांचे नुकसान होत आहे. योग्य वेळी पाणी मिळाल्यामुळे संत्रा, कपासीचे नुकसान झाले, याकडे लक्ष वेधण्यात आले. आंदोलकांच्या मागण्या कामाच्या व्यापानुसार आठ िदवस ते एक महिना, अशा कालावधीत पूर्ण करून देण्यात येणार, असे लेखी आश्वासन अधीक्षकांनी िदले. या वेळी राजेश सोलव, भास्कर सायंदे, शिवा भुयार, अजय तायडे, गजानन ठाकरे, एकनाथ अवसरमोल, संतोष किटुकले, भगवंत दामेधर, संतोष धर्माळे यांच्यासह अन्य प्रहार कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.
१.कार्यकर्त्यांनी अधीक्षक अभियंता िदलीप घुगल यांच्या टेबलावर संत्री टाकून पिकाच्या नुकसानाकडे लक्ष वेधले. २. अधीक्षक कार्यालयात िठय्या. ३. कार्यकर्त्यांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाचारण केले. छाया: मनीष जगताप
मागण्या पूर्ण करण्याचे दिले आश्वासन
^प्रहारनेआंदोलन केले आहे. मागण्या केलेले काम तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे. यासंबंधात लेखी आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांना योग्य वीजपुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दिलीपघुगल, अधीक्षकअभियंता.
सध्या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता
^सध्यापिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, भारनियमनाव्यतिरिक्त सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे आवश्यक ते काम तातडीने करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तीन दिवंसापूर्वी इशारा देण्यात आला होता. मात्र, स्थिती ‘जैसे-थे’ राहिल्यामुळे शनिवारी िठय्या आंदोलन करण्यात आले. अधीक्षक अभियंत्यांनी लेखी आश्वासन िदले आहे. मंगेशदेशमुख, माजीसभापती, कृ. उ. बा. समिती, चांदूर बाजार.