आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Surekaha Thakare News In Marathi, Government Car Issue

अंबर दिव्याचा मोह ठरणार अधिकार्‍यांसाठी नवे संकट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सुप्रीम कोर्टाचे आदेश, राज्य शासनाच्या जीआरनंतरही लाल दिवा व अंबर दिव्याचा मोह न सुटणार्‍या जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे आणि आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त भास्कर वाळिंबे यांच्यावर नवे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत.

शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद असतानाही ठाकरे व वाळिंबे यांच्याकडून फ्लॅशरसह लाल दिवा आणि अंबर दिवा वापरला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आता प्रादेशिक परिवहन विभाग त्यांच्या वाहनांची तपासणी करणार आहे. सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या शासकीय वाहनाला काळी फिल्म असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने ही फिल्म काढायला लावली. महिवाल यांनी घेतलेल्या या पुढाकारातून राजकीय नेते, अधिकार्‍यांनी प्रेरणा घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे आता आरटीओनेच कारवाईसाठी पुढाकार घेण्याची तयारी चालवली आहे.
पत्र नको, कारवाई हवी
सुप्रीम कोर्ट, शासनाच्या जीआरपेक्षाही स्वत:ला श्रेष्ठ समजाणार्‍यांना आता आरटीओने पत्र, इशारा देऊ नये. थेट कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा कायद्यापेक्षा अधिकारी, पदाधिकारीच मोठे आहेत. कायदा केवळ सर्वसामान्यांसाठीच आहे. सामान्यांनी कायदा मोडला तर तुरुंगाची हवा आणि अधिकारी, पदाधिकार्‍यांनी कायदा मोडला तर केवळ इशारा असाच संदेश लोकांमध्ये जाईल, याचे आरटीओने भान ठेवावे. अमर सोळंके, नागरिक