आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपनिरीक्षकाला केले तडकाफडकी निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - घरफोड्या व गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रणासाठी तैनात पोलिस नाकाबंदीस्थळी खाली बसल्याचे आढळल्यामुळे पोलिस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी रविवारी राजापेठचे पोलिस उपनिरीक्षक मनीष मानकर यांना तडकाफडकी निलंबित केले. कारवाईमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिस आयुक्त रविवारी दुपारी 12 च्या दरम्यान बडनेराच्या दिशेने जात असताना राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी सुरू होती. तैनात पोलिस उपनिरीक्षक मानकर आणि कर्मचारी खाली बसलेले त्यांना आढळले. काही वेळानंतर आयुक्त पुन्हा त्याच मार्गाने परतत असतानासुद्धा कर्मचारी, अधिकारी खाली बसलेलेच आढळले. यामुळे संतापलेल्या आयुक्तांनी त्याच क्षणी वॉकी टॉकीवरून नियंत्रण कक्षाला, या उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश दिला. जबाबदार अधिकाºयांनी असा पायंडा घातल्यास कर्मचाºयांवर वचक बसणार तरी कसा, असा ठपका ठेवून कारवाई करण्यात आल्याचे समजते. उपनिरीक्षकांवर झालेल्या तडकाफडकीच्या कारवाईमुळे पोलिस वर्तुळात रविवारी हीच चर्चा रंगली होती.ठ
नाकाबंदीमध्ये खाली बसल्यामुळे कारवाई
नाकाबंदी सुरू असताना प्रत्येक वाहनाची तपासणी, वाहनचालकाची विचारपूस करणे आवश्यक आहे. मात्र, कर्तव्य पार न पाडता अधिकारी, कर्मचारी खाली बसलेले आढळल्याने संबंधित उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी उपनिरीक्षक प्रमुख असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली.
- डॉ. सुरेशकुमार मेकला, पोलिस आयुक्त.