आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीच्या डॉक्टरचा मृत्यू, विभागातील सर्व आरोग्य संस्थांना दिला सतर्कतेचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अमरावती येथील डॉक्टरच्या मृत्यूनंतर आरोग्य उपसंचालकांनी विभागातील सर्व आरोग्य संस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुका आरोग्य केंद्राच्या डॉ. विशाखा निकोसे यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे.
तेलंगणा राज्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असताना अचानक राज्यातील नागपूर अमरावतीत स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहे. अमरावती विभागात स्वाइन फ्लूचा धोका वाढल्याने उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी स्वाइन फ्लू होऊ नये, यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अमरावती परिमंडळातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन आवश्यक औषधीसाठा ठेवण्याबाबत आदेशित केले आहे. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कुणीही रजेवर जाऊ नये, अशाही सूचना िदल्या आहेत.
ताप, सर्दीकडे दुर्लक्ष नको
लहानमुले, वयोवृद्ध व्यक्तींना ताप, सर्दी असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी केले आहे.
अशी घ्या खबदारी
खोकलाकिंवा शिंक आल्यास नाकातोंडावर रूमाल अथवा टिश्यू पेपर ठेवावा.
आजारी व्यक्तीच्या संपर्कात फार काळ राहू नये. फ्लूसारखी लक्षणे दिसू लागल्यावर दिवस किंवा लक्षणे गायब होण्याच्या २४ तासांपर्यंत घरातच थांबा.