आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर शहरासाठी स्वच्छतेचा जागर, जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरात मोहीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बालकिदनाचे औचित्य साधून शहरातील विविध संस्था, संघटना आणि कंपन्यांनी शुक्रवारी (दि. १४) विविध भागांत स्वच्छता अभियान राबवले. जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा परिषद, जिल्हा निबंधक कार्यालय इर्विन रुग्णालयात अमरावती शाखेच्या जवळपास ४० कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष कृतीद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत जनजागृती केली.साफसफाईसोबतच मी कचरा करणार नाही इतरांना करू देणार नाही, अशी शपथ नागरिकांना देण्यात आली; तसेच शाळेतून घरी परतणाऱ्या मुलांना चाॅकलेटचे वाटप करून कर्मचाऱ्यांनी चिमुकल्यांचा आनंद द्विगुणीत केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा घेऊन शहरातील बजाज अलायन्झ लाइफ इन्श्युरन्सच्या अमरावती शाखेतर्फेही स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. मोहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते करण्यात आली. प्रसंगी जि. प. अध्यक्ष सतीश उईके, रवींद्र मुंदे सुभाष बोडखे उपस्थित होते. सकाळी आठ ते साडेदहा असे तब्बल अडीच तास सदस्यांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात साफसफाई केली. जिल्हाधिकारी किरण गित्ते हे सदस्यांना शुभेच्छा देत स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरानंतर चमूंनी जिल्हा परिषद येथील परिसर स्वच्छ केला. कंपनीचे वरिष्ठ विभागीय प्रबंधक प्रशांत मोंढे, व्यवस्थापक चंद्रशेखर गुल्हाने, केतन दाते, नीलेश देशमुख, अर्पित श्रीराव, सचिन तायडे, फरहान अली, अनुपम ठाकूर, कपिल भावसार आदी यात सहभागी झाले.

अभियान सुरूच राहील
स्वच्छताअभियान पुढेही सुरू राहील. महिन्यातून एकदा हे अभियान शाळा- महाविद्यालय, शासकीय कार्यालय किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी राबवण्यात येईल. प्रत्येक अभियानात सदस्यांचा प्रतिसाद वाढवून शहर स्वच्छ सुंदर करण्यावर भर दिला जाईल. चंद्रशेखरगुल्हाने, व्यवस्थापक,बजाज अलायन्झ लाइफ इन्श्युरन्स.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळीच स्वच्छता अभियान राबवले गेले.
स्वच्छतेची शपथ अन् लघुपट
जिल्‍हाधिकारीजिल्‍हा परिषद कार्यालयातील जवळपास ३०० नागरिकांकडून स्वच्छता अभियानाची शपथ असलेले कार्ड भरून घेण्यात आले. त्या कार्डवर संबंधित नागरिकांची सही, नाव संपूर्ण पत्ता घेऊन त्यांचा लघुपट तयार करण्यात येणार आहे.
चिमुकल्यांचा आनंद झाला द्विगुणित
स्वच्छताअभियानासोबतच बालदिनाचे औचित्य साधून बजाज अलायन्झच्या चमूंनी लहान मुलांना चॉकलेटचे वाटप केले. शाळेतून घरी परतणाऱ्या चिमुकल्यांना चॉकलेटचे वाटप करून बाल दिन साजरा करण्यात आला. रस्त्यावरून जाणाऱ्या मुलांना चॉकलेटचे वाटप केल्याने चिमुकल्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता