आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tab Distribution For Adarsh Shikshak In Amaravati

आदर्श पुरस्कारप्राप्त 105 शिक्षकांना मिळणार ‘टॅब’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, या हेतूने 2012-13 मधील आदर्श पुरस्कारप्राप्त 105 शिक्षकांना लवकर टॅबलेट पीसी मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

ई-गव्हर्नन्स प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत अल्प सूचना निविदा प्रक्रियेतून टेबलेट पीसी खरेदी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे विहित मार्गाने पुण्याच्या शिक्षण संचालनालयातून निविदा प्रक्रिया करण्यात आली असून, 105 टॅबलेटसाठी निधी देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात येणार आहे.

5 सप्टेंबर 2012 रोजी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्षकांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासाठी शिक्षकांना लॅपटॉप, संगणक वा तत्सम साधने उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.

टॅबलेटचा दर 8800 रुपये
निविदा प्रक्रियेतून एल-1 म्हणून निवड झालेल्या मुंबईतील डेटामिनी टेक्नॉलॉजी लि. कडून प्रतिटॅबलेट 8800 रुपये दर निश्चित केला आहे. 2012-13 मधील आदर्श शिक्षक शिक्षकांना टॅबलेटचे वाटप होईल, त्यास शासनाची मंजुरी देण्यात येणार आहे.