अमरावती - ‘हृदयी वसंत फुलताना..’ हे गीत माहीत नसले, असा बहुदाच कुणी तरी असावा. वसंतोत्सव म्हणजे ऋतुमानातील बदलाचा काळ; पण याच वसंतोत्सवात आहाराची चांगलीच काळजी घ्या, असा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञांनी दिला आहे. ऋतुमानानुसार शरीरात होणार्या बदलांमुळे ही काळजी घ्यावी, असे आयुर्वेद तज्ज्ञांचे मत आहे.
असा असावा आहार
0 कवठासारखे तुरट रसाचे फळ वसंत ऋतूत चांगले.
0 कडूलिंब, गूळ, आल्याची चटणी खावी, त्याने कफ नाहीसा होतो.
0 आले आणि सुंठ घालून ताक प्यावे.
0 आले, लसूण, वांगी खावी.
0 पाण्यात काही वेळ धणे भिजत घालावे. नंतर हे पाणी गाळून घ्यावे व दिवसभर पिण्यासाठी वापरावे. शरीरातील उष्णता कमी होते.
0 दिवसभरातून किमान तीन ते पाच लिटर पाणी प्यावे.