आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान ! रात्री दहानंतर डीजे वाजवाल, तर लागेल पाच लाखांपर्यंतचा दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिसांची परवानगी घेता किंवा रात्री दहानंतर डीजे वाजवल्यास आता पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. यापूर्वी होणारी कारवाई ही मुंबई पोलिस कायद्यानुसार केली जायची. आता ही पुढील काळात ध्वनिप्रदूषण कायद्यान्वये करण्यात येणार आहे. या कायद्यान्वये पाच लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली.
आता परीक्षांचा हंगाम सुरू होत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कर्कश आवाजाचा त्रास होऊ नये, त्यामुळे पोलिसांनी आता धडक कारवाईची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अनेक लॉन, मंगल कार्यालयात रात्री दहा वाजल्यानंतरही डीजे वाजवण्यात येतो. अनेकदा तर डीजे वाजवण्यासाठी पोलिसांकडून परवानगीसुद्धा घेण्यात येत नाही. यापुढे मात्र विनापरवानगी डीजे वाजवल्यास पोलिस डीजेचे साहित्य जप्त करणार आहेत.

परवानगी घेऊनही रात्री दहा वाजल्यानंतरही डीजे वाजवल्यास त्यावरसुद्धा पोलिस कारवाई करणार आहे. डीजेवर कारवाई करण्यासाठी रोज रात्री दहा वाजतानंतर प्रत्येक ठाण्याचे पोलिस पथक परिसरात गस्त घालणार आहे. रात्री दहानंतर डीजे वाजवणाऱ्याविरुद्ध पोलिस ध्वनिप्रदूषण कायद्यान्वये कारवाई करणार आहे. यामध्ये जप्त केलेले डीजेचे साहित्य प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत जप्त राहते.

तसेच यामध्ये पाच लाख रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद आहे, असेही पोलिस उपायुक्त घार्गे यांनी सांगितले. बुधवारी पोलिसांनी मंगल कार्यालय, लॉन डीजे संचालकांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी त्यांचेही मत जाणून घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

एका दिवसात मिळणार परवानगी : डीजेवाजवण्यासाठी पुढील काळात पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. ही परवानगी डीजे मालक, आयोजक, मंगल कार्यालय किंवा लॉन संचालक यांपैकी कोणीही एकाने घेतली तरी चालेल.

पोलिसांकडून परवानगी एका दिवसात देण्यासाठी प्रत्येक ठाण्यात तसे आदेश देण्यात येतील, असेही उपायुक्त घार्गे यांनी सांगितले. तसेच एखाद्या फेरीदरम्यान जर डीजे वाजवायचा असेल, तर ही फेरी ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणार आहे, त्या त्या ठाण्यांची परवानगी त्यांना घ्यावी लागणार आहे.